तळेगाव दशसर येथे गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करणे व 933 रुपयातच घरपोच उपलब्ध करून देण्याची मागणी.






भाजपा युवा मोर्चा यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

        निलेश रामगावकर जिल्हा प्रतिनिधी

  तळेगाव दशसर :- आज दिनांक 16 एप्रिल रोजी धामणगाव रेल्वे तहसीलदार अभय घोरफडे यांना निवेदन देऊन तळेगाव दशासर येथे सिलेंडर संबंधित समस्या तहसीलदार धामणगाव रेल्वे यांच्यासमोर मांडल्या, यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण उर्फ बबलू खैरकर तुषार धनजोडे भाजपा युवा मोर्चा महामंत्री तसेच तळेगाव दशासर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी पंकज पेटकर, अविष कावळे व संतोष बगाडे उपस्थित होते. 

Village news network


यावेळी धामणगाव गॅस डोमेस्टिक ऑफलाईन्सेस चे संचालक निखिल भन्साली व इतर नागरिक उपस्थित होते. त्यावेळी गॅस एजन्सी संचालक निखिल भन्साली यांनी गॅस एजन्सीच्या सिलेंडर पुरवठा सुरळीत करून 933 रुपये या किमतीतच तळेगाव दशासर येथे सिलेंडर घरपोच उपलब्ध करून देण्याची हमी यावेळी त्यांनी घेतली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post