सिंदखेड पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात डीजे बंदीची होणार अंमलबजावणी! - सपोनि रमेश जाधवर

 


 

Village news network



 माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील परिसरात येणाऱ्या विश्वरत्न महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती काळात मिरवणुकीसाठी डीजे सिस्टीम किंवा मोठा आवाज असलेली कोणतीही ध्वनी प्रणाली वापरण्याची परवानगी देण्यात येणार नाही असे आदेश नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिले आहेत.

त्या आदेशाची अंमलबजावणी सिंदखेड पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात येईल अशी माहिती सिंदखेडचे सपोनी रमेश जाधवर यांनी दिली आहे, सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व सार्वजनिक जयंती उत्सव मंडळाच्या आयोजकांना बोलावून याबाबतची पोलीस स्थानकात बैठक घेण्यात आली होती, या बैठकीत पोलीस प्रशासनाने जयंती मिरवणूक आयोजकाला याबाबतची स्पष्ट सूचना दिली आहे, डॉल्बी डीजे आणि कर्णकर्कश व डेसिबल मर्यादेच्या पलीकडे आवाज असलेल्या ध्वनी प्रणालीच्या वापराला अजिबात परवानगी देण्यात येणार नाही, याशिवाय निर्धारित वेळेच्या आत मिरवणूक संपवणे अनिवार्य असेल, असे सपोनि रमेश जाधवर यांनी सांगितले आहे,या सूचनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल याची काळजी घेतली जाईल असे जाधवर यांनी आयोजकांना सूचित केले,या काळात प्रत्येक्ष अप्रत्येक्ष नियमाचे उल्लंघन करणाऱ्याच्या विरोधात कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, व डीजे जप्त करून डीजे चालक व मालकावर,व आयोजकावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे,असेही यावेळी सपोनि रमेश जाधवर यांनी सांगितले आहे.

1 Comments

  1. डिजे बंद करत आहात तसेच दारू बंद करा साहेब खुलेआम दारू विकत आहे तुम्ही काय करत आहात यावर दिसते का तुम्हाला?

    ReplyDelete
Previous Post Next Post