मूर्तिजापूरात प्रा. विठ्ठल कांगणे यांचे जाहीर व्याख्यान; विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनाची सुवर्णसंधी

 




Gavakadachi batmi editor Milind jamnik 

मूर्तिजापूर : शहरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणाला नवी दिशा देणारा भव्य सोहळा येत्या शनिवारी पार पडणार आहे. क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रसिद्ध वक्ते प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, ते प्रथमच मूर्तिजापूर शहरात येत आहेत.

‘स्पर्धा परीक्षा आणि आजचा विद्यार्थी’ या विषयावर होणारे हे व्याख्यान तिडके नगर येथील राधा मंगलम् हॉल येथे शनिवार, ११ एप्रिल  रोजी सकाळी ११वाजता सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष संजय नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे , प्रा. विठ्ठल कांगणे हे त्यांच्या विनोदी आणि प्रभावी मार्गदर्शन शैलीसाठी ओळखले जातात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे कसे वळावे, अभ्यासाचे नियोजन कसे करावे तसेच अपयशावर मात करून यश कसे मिळवावे, याबाबत ते सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन जी. के. अकॅडमीचे संचालक रवि गोंडकार यांनी केले आहे. “विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि महापुरुषांच्या विचारांची प्रेरणा घ्यावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे,” असे त्यांनी सांगितले. या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post