महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक संपन्न

 


गावाकडची बातमी &गाव सहेली नेटवर्क 

अमरावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बैठक गुरुदेव सेवाश्रम येथे दि. ४ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुभाष गौरखेडे होते. बैठकीची सुरुवात गीताने करण्यात आली.

बैठकीचा अहवाल विजय डवरे यांनी वाचून दाखविला. वर्धा येथे होणाऱ्या शिबिराबाबतची माहिती मंजू वासनिक यांनी दिली. बैठकीत उपस्थित सर्व साथीदारांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीच्या कामाबाबत आपापले विचार मांडले. बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून गजेंद्र सूरकार यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीत महाराष्ट्र जादूटोणा व मानव बळी प्रतिबंधक कायदा प्रभावीपणे अंमलात यावा यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नाशिक येथे उघडकीस आलेल्या खरात या भोंदू प्रकरणाचा व त्याला संरक्षण देणाऱ्या राजकीय तसेच इतर संबंधित घटकांचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी नाशिक येथे आयोजित फलज्योतिष व बुवाबाजी विरोधी परिषदेत अमरावती येथून एक प्रतिनिधी सहभागी झाल्याची माहितीही बैठकीत मांडण्यात आली.

बैठकीला मोहम्मद अफसर भाई, नरेंद्र धर्माळे, पल्लवी ढोले, लक्ष्मणराव तडस, सुरेखा रंगारी, गजेंद्र सुदाम लोणारे, सचिन सुदाम खोब्रागडे, वर्षा गावंडे, रवींद्र फुले आदी उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी रवींद्र फुले यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. हा केक वर्षा गावंडे यांनी आणला होता.

यावेळी समितीच्या पुढील कार्यक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली. दि. १० एप्रिल रोजी बडनेरा येथे चवदार तळे सत्याग्रह व संविधान जागर कार्यक्रम, तसेच दि. ११ एप्रिल रोजी महात्मा फुले जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम व संविधान प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post