प्रकाश साबळे यांचा जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाकारिता अर्ज दाखल

 


         जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 

काँग्रेस पक्षाचे आक्रमक नेतृत्व, शेतकऱ्यां चे लढवय्ये नेतृत्व प्रकाश साबळे  यांनी दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी AICC निरीक्षक आफताब अहमद त्यांच्याकडे अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला. 

त्यांच्या समवेत पक्ष संघटने संदर्भात सविस्तर चर्चा करून काँग्रेसला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी   समजणाऱ्या पासून पक्षाला वाचवावे ,अशी आग्रहीमागणी केली. तसेच आम्ही पक्ष विरोधातले नसून हेकेखोर व्यक्ती विरोधात आमची भूमिका आहे, आणि ती भविष्यात पण राहील असे नमूद केले. विधान परिषदा निवडणुका ,जिल्हा परिषद निवडणुका, लोकसभा व विधानसभा मध्ये झालेल्या निवडणुका याबाबत प्रकाश साबळे यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली.




Post a Comment

Previous Post Next Post