प्रशांत राठोड यांनी श्रद्धा चुंगडेच्या घरी जाऊन केला सत्कार

 



बेटा अभ्यास करून अधिकारी बनत आई वडिलांचे स्वप्न पूर्ण कर 


 श्रद्धाला दिला प्रशांत राठोड यांनी मोलाचा सल्ला 



श्रीक्षेत्र माहूर :  माहूर तालुक्यातील पुनर्वसीत जुन्या लिंबायत गावातील श्रद्धा चुंगडे हिची वर्धा पोलिसात निवड झाल्याने मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत भाऊ राठोड यांनी रस्ता नसलेल्या जुन्या लिंबायत येथे तिच्या घरी जाऊन दि 18 रोजी आई-वडिल नातेवाईक मान्यवरांच्या उपस्थितीत हृदय सत्कार करून बेटा आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अधिकारी बन असा मोलाचा सल्ला देऊन आशीर्वाद दिले.

मौजे जुने लिंबायात हे पुनर्वसित गाव असल्याने येथे शासकीय कुठली सुविधा नाही विद्युत पुरवठा राहत नाही रस्ता नाही विहिरीतील पाणी पिऊन शिक्षणाची आवड असल्याने तिने माहूर सह इतर ठिकाणी शिक्षण घेऊन पोलीस भरतीत नशीब आजमावल्याने तिची निवड वर्धा पोलिसात झाली ही आनंद वार्ता कळताच मोजे जुने लिंबायत येथे आप्तस्वकीय गावकऱ्यांनी तिचा हृदय सत्कार करून अभिनंदन केले निवडीची वार्ता मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांना कळाल्याने मौजे जुने लिंबायत गाठून श्रद्धा युवराज सिंह चुंगडे हिचा आई-वडील नातलग गावकऱ्या समक्ष हृदय सत्कार केला 



यावेळी प्रशांत राठोड यांचे सह पत्रकार इलियास बावाणी श्री दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय कांबळे,  श्रद्धा चुंगडे, युवराज सिंह चुंगडे ,रामाजी जाधव, प्रकाश ताटू उपसरपंच सुनील चुंगडे ,दिलेर चुंगडे ,सुरेंद्र चुंगडे, बंटी चुंगडे ,प्रकाश चुंगडे ,लक्ष्मण कऱ्हाळे, रितेश चुंगडे, यश चुंगडे, दिनेश पवार ,बंडू राठोड, प्रदीप पवार ,करण गेडाम यांचे सह मान्यवर उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post