यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना कार्यान्वित करण्याची मागणी !


Village news network



 इतर मागास बहुजन कल्याण विभागा मार्फत समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी जीवनदाई ठरणारी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेअंतर्गत नव्याने उद्दिष्ट सुरू करून संबंधित कार्यालयास तात्काळ लाभार्थ्यांचे चे प्रस्ताव स्वीकारून मंजूर करण्यासाठी आदेशित करणे बाबत विनंतीकरत निवेदन देऊन मागणी केली आहे.



समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांना निवारा सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजना शासनामार्फत राबविण्यात येत होती. सदर योजना ही गरजू व वंचित घटकांसाठी अत्यंत उपयुक्त व जीवनमान उंचावणारी ठरलेली आहे.

         परंतु महाराष्ट्र शासन, इतर बहुजन कल्याण विभाग, उप सचिव,यांनी क्रमांक - घरकुल - 2025/प्र.क्र.86/योजना - 5, दिनांक. 23/05/2025 रोजी पत्र जारी करून घरकुल योजनेअंतर्गत नव्याने उद्दिष्ट न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे समाजातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे या योजनेपासून वंचित राहत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे.

        सदर बाब लक्षात घेता,आपणास नम्र विनंती आहे की,वरील पत्रातील निर्णयाचा पुनर्विचार करून त्यामध्ये आवश्यक बदल करण्यात यावा व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत (घरकुल) योजनेअंतर्गत नव्याने उद्दिष्ट सादर करण्यास तात्काळ अनुमती देण्यात यावी.यामुळे समाजातील गरजू व दुर्बल घटकांना निवाऱ्याची सुविधा उपलब्ध होईल व त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.

        आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय प्रस्ताव चालू करण्यासाठी समाज कल्याण अप आयुक्त यांना निवेदन देऊन विनंती केली आहे.

ऑल इंडिया बाजार सेवा संघ चे मराठवाड उपाध्यक्ष 

रवि उत्तमराव राठोड,सुदर्शन जोगराम राठोड,मायकेल फुलशिंग राठोड,हिराशिंग चव्हाण,आशिष पवार,आशिष चारभाई,वैभव पवार,गणेश हिरामण राठोड,अभिषेक जाधव,निलेश राठोड,पवन शर्मा. आदींची उपस्थित होती.

Post a Comment

Previous Post Next Post