महाराणा टायपिंग इन्स्टिट्यूटची उज्वल यशाची परंपरा कायम ; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा प्रशांत राठोड यांच्या हस्ते सत्कार

 


महाराणा टायपिंगचा दमदार निकाल; विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार


माहूरमध्ये महाराणा टायपिंगची यशस्वी परंपरा कायम


विद्यार्थ्यांच्या यशाला सलाम; प्रशांत राठोड यांचा विशेष सत्कार कार्यक्रम


महाराणा टायपिंग इन्स्टिट्यूटचा पुन्हा उज्वल निकाल


उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव; माहूरमध्ये आनंदाचे वातावरण



माहूर : शहरातील महाराणा टायपिंग इन्स्टिट्यूट ने यंदाही उज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाची दखल घेत मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांनी संस्थेला भेट देऊन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षक व संचालकांचा सत्कार केला.

या वेळी बोलताना प्रशांत राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

महाराणा टायपिंग इन्स्टिट्यूट ही माहूरमधील अग्रगण्य संस्था असून अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत आहे. संस्थेचे संचालक नयनसिंह राठोड व श्रीमती मेघा मनवर हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या संस्थेतील अनेक विद्यार्थी शासकीय नोकरीसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.



कार्यक्रमास पत्रकार विजय आमले, दत्तात्रय शेरेकर, एस. एस. पाटील, लिंबायतचे उपसरपंच सुनील चुगडे, दत्तकृपा प्रतिष्ठानचे संचालक विजय कांबळे, बंडू राठोड, प्रदीप पवार, दिनेश पवार, रवि वायकुळे, करण गेडाम, शेख सलीम, कादर भाई बावाणी, गजानन शड्डलवार, दिगंबर जोशी, राजू पवार, नवल वानखेडे, भारत राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नेहा राठोड (88.5), चैतन राठोड (88.5), नैना मुंडे (87), आदित्य कचवारे (86), चैतन दुधे (85.5), रोहन बेहेरे (82.5), नैतिक कांबळे (80), श्लोक शड्डलवार (79), राधिका परिहार (76.5), आदित्य पांडे (75.5), संशम कोकाटे (75), कपिल राठोड (74), ओम राठोड (65), संकेत दुधे (65) आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.




Post a Comment

Previous Post Next Post