वरोरा (जि. चंद्रपूर) : रेल्वे विभागातील कार्यकारी अभियंता सिद्धार्थ गुप्ता यांच्या विरोधात वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५३७/२०२६ नुसार गंभीर स्वरूपाचा FIR दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ अंतर्गत कलम ६१(२), ३१६(५), ३१८(४), ३३६(३), ३४०(१) आणि ३४०(२) अशा एकूण सहा कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात कटकारस्थान रचणे, संगनमत करणे, फसवणूक करणे, बनावट दस्तऐवजांचा खरा म्हणून वापर करणे, सरकारी जमिनीवर अवैध मुरूम उत्खनन करणे, राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात लूटमार करणे तसेच पर्यावरण धोक्यात आणणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.
या गुन्ह्यांमध्ये सात ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याने आरोपी सिद्धार्थ गुप्ता यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.
