डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मौजे जलधरा येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन

 




किनवट : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  जलधरा येथे मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमात बाबासाहेबांच्या महान कार्याचा आढावा घेण्यात आला. समाजातील समानता, शिक्षण आणि न्याय यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाची आठवण करून देण्यात आली. या निमित्ताने रॅली, भाषण तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करण्याचे आवाहन केले. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्यांच्या संदेशाचा पुन्हा एकदा जागर करण्यात आला. समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते डॉ. पुंडलिक आमले (माळबोरगावकर) होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. पंजाबराव शेरे , प्रमुख वक्त्या ॲड. सोनकांबळे , तर प्रमुख पाहुणे म्हणून जलधरा येथील मेडिकल ऑफिसर डॉ. गौतम नरवाडे , मा. सोनकांबळे श्री भुरके किशोर कावळे , सुर्यभांन खंदारे,तसेच गावच्या सरपंच वैशाली अनिल पाचपुते,पाचपुते उपस्थित होते.

यावेळी जलधरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी अर्ज करण्याचे आवाहन गावातील युवा कार्यकर्त्यांना करण्यात आले. तसेच डॉ. पुंडलिक आमले यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी ५१,००० (एकावन हजार) रुपयांची देणगी जाहीर केली.

Post a Comment

Previous Post Next Post