हिराबाई गोयनका विद्यालय धामणगाव रेल्वे येथे एचपीव्ही लसीकरणाबाबत पालक सभेचे आयोजन

 


जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर

मो. 8806581053                                          

    धामणगाव रेल्वे :- आज दिनांक 20/4/2026 रोजी हिराबाई गोयणका विद्यालय धामणगाव रेल्वे येथे HPV लसीबाबत पालक सभा आयोजित करण्यात आली. या सभेला पालक, विद्यार्थी व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.

         विद्यार्थी व पालक यांना HPV या लशी बाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले तसेच HPV या लसीचे महत्त्व समजून सांगण्यात आले आणि समाजामध्ये पसरत असलेल्या इतर संभावित बाबी चे दुरीकरण करण्यात आले व पालकांमधला संभ्रम दूर करण्यात आला. या बाबत योग्य माहिती देऊन विद्यार्थ्यांना व पालकांना या लसीकरिता प्रवृत्त करण्यात आले तसेच ८ विद्यार्थ्यांना आज ग्रामीण रुग्णालय येथे लशी देण्यात आल्या.   







      याकरिता विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पालक आणि विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमाकरिता डॉ. विवेक सुदेवाड तालुका आरोग्य अधिकारी, कांचन रहांगडाले MS ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे तसेच गोकुल बांबल विस्तार अधिकारी आरोग्य मनिष निरमुंडे वरिष्ठ सहाय्यक क्षयरोग तसेच बाबूलाल जयस्वाल आरोग्य सहाय्य यांनी योग्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post