दत्तशिखर संस्थानचे महंत कै मधुसूदन भारती अनंतात विलीन

 

Mahurnews Maharashtra

लाखो भक्तांनी दिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप. 




जगप्रसिद्ध दत्तशिखर संस्थानचे 30 वे महंत कै प.पू. मधुसुदन भारती महाराज यांचे दि 4 एप्रिल 2026 रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले होते त्यांचे वर दि 5 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजता शोकाकुल वातावरणात दत्तशिखर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता. यावेळी भक्तांना अश्रु अनावर झाले होते.



प.पु कै.महंत मधुसूदन भारती यांचा जन्म अहिल्या नगर येथे झाला असून त्यांना वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी दत्तशिखर संस्थान येथे श्री दत्त चरणी अर्पण करण्यात आले होते हिवरा ता महागाव येथील शाळेत 10 वीची परीक्षा झालेवर दिक्षा देण्याचे निश्चित झाले त्यानंतर बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थांवर दत्त प्रभुंच्या सेवेत असताना प.पू .प.कै.महंत गुरू अच्युत भारती यांचे वारस म्हणून सन 1978 साली 30 वे महंत म्हणून गादीवर विराजमान झाले .त्यांचा 48 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला असून दि 4 एप्रिल 2026 रोजी त्यांचे निधन झाले. 

 दि 5 एप्रिल रोजी परंपरेनुसार त्यांचे वारस म्हणून ईश्वर चिठ्ठीने प.पू.प.योगी धनेश्वर भारती उर्फ श्याम भारती महाराज यांची 31वे महंत म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प.पू.प.कै.महंत गुरुमधुसुदन भारती यांचेवर शोकाकुल वातावरणात विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी प्रचंड जनसागर लोटला होता यावेळी लाखो भक्तांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.

यावेळी माहुर करांनी आपले सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून प.पु.प.कै.महंत मधुसूदन भारती (मालक)यांना श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माहूरवासियांतर्फे गडावर आलेल्या भक्तांसाठी दत्तनगर (टिपॉईंट) येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच माहुर आगारातर्फे भाविकांना दत्तशिखरावर जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी तहसीलदार अभिजित जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 आर्णी जिल्हा यवतमाळ येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमृतवाणीतून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथे च्या शेवटच्या दिवशी परमपूज्य महंत श्री मधुसूदन भारती महाराज यांचे निधनाची वार्ता कळताच लाखो भक्तांनी श्रद्धांजली अर्पण केली.




Post a Comment

Previous Post Next Post