Gavakadachi batmi network
नांदेड शहरातील आनंद नगर भागातील तुलसी कम्फर्ट हॉल येथे दिनांक 20 एप्रिल २०२६ रोजी माँ संतोषी गर्ल्स व बॉईज हॉस्टेलच्या वतीने बारावी (NEET) विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. आगामी नीट परीक्षेच्या धकाधकीच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक पाठबळ आणि शुभेच्छा देण्यासाठी या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या आयोजिका माँ संतोषी हॉस्टेलच्या संचालिका सौ. जयश्री संजयकुमार जयस्वाल या होत्या. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्नपूर्णा ट्रस्टच्या अध्यक्षा सुषमा गहेरवार, डॉ. हनुमंत भोपाळे, फिजिक्स क्लासेसचे साईकिरण सलगरे, डॉ. गीतांजली श्रीरामे, विष्णू गोडबोले दत्तप्रसाद तालीमकर आणि विजयसिंह गहेरवार यांची लक्षणीय उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशासाठी 'गुरुमंत्र' दिला. कठीण परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन आणि आभार संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनी केले. त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने कार्यक्रमाची रंगत वाढवली आणि सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांचे आभारही मानले.
शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग
तुलसी कम्फर्ट हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. संचालिका जयश्री जयस्वाल यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. दीर्घकाळ हॉस्टेलमध्ये राहून अभ्यास करणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत भावूक आणि तितकाच प्रेरणादायी ठरला. परिश्रम आणि नियोजन हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संजयकुमार जयस्वाल यांच्यासह माँ संतोषी हॉस्टेलच्या सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ठ नियोजनामुळे या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे.



