समर कॅम्पमुळे साद्राबाडीच्या विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव

 


धारणी, अमरावती – पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, साद्राबाडी, ता. धारणी येथे नुकतेच पाच दिवसीय उन्हाळी शिबिराचे उत्साहात आयोजन करण्यात आले. 




 अमरावती / साद्राबाडी 

   शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व सुट्टीचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने आयोजित केलेल्या या समर कॅम्पमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. शिबिरात चित्रकला स्पर्धा, कथाकथन आणि नृत्य मार्गदर्शन असे मनोरंजक व शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात आले. 



चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी निसर्ग, सामाजिक संदेश व गावातील जीवन यावर आधारित सुंदर चित्रे रेखाटली. कथाकथन सत्रात मुलांनी लोककथा व प्रेरणादायी गोष्टी सादर करून रसिकांची मने जिंकली. तर नृत्य मार्गदर्शन सत्रात तज्ज्ञांनी पारंपरिक व आधुनिक नृत्य प्रकारांचे धडे दिले, ज्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. 



शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. समारोप प्रसंगी विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

यावेळी उन्हाळी शिबिराचे उद्घाटन मुख्याध्यापक राजेंद्र राऊत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुष्पा ताई पटेल उपस्थित होत्या. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेहेरे सर यांनी केले व आभार प्रदर्शन सोनटक्के सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post