धामणगाव रेल्वे येथील नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड (रोठे) यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

 





धामणगाव रेल्वे येथील नगराध्यक्ष डॉ. अर्चना अडसड (रोठे) यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महा आरोग्य शिबिर नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 



 धामणगाव रेल्वे :-    आज दिनांक 24 /4 /2026 रोजी "नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र" दत्तापूर वार्ड. ८ धामणगाव रेल्वे  येथे तालुका आरोग्य कार्यालय धामणगांव, ग्रामीण रुग्णालय धामणगांव,गोळे मेडिकल कॉलेज व लायन्स क्लब विलास बुटले मित्रपरिवार धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने धामणगाव नगरपरिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा डॉ.अर्चनाताई अडसड (रोठे)यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिर नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. 





या शिबिरात विशेष अतिथी म्हणून नगराध्यक्षा डॉ. सौ. अर्चनाताई अडसड (रोठे) व नगरसेवक विलास बुटले तसेच  डॉ. विवेक सुदेवाड (तालुका आरोग्य अधिकारी धामणगाव रेल्वे) डॉ. कांचनताई रहांगडाले (वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे )उपस्थित होते या शिबिरात सामान्य तपासणी ब्लड शुगर इसीजी ,ब्लड प्रेशर व इतर तपासण्या व औषधी वाटप मोफत करण्यात आले .या शिबिरात डॉ.आकाश  येंडे (हृदयरोग व मधुमेह तज्ञ ), डॉ.सायली खडसे (नेत्ररोगतज्ञ )व डॉ.राजेंद्र गोडे कॉलेज व हॉस्पिटल अमरावती येथील टीम तसेच तालुका आरोग्य टीम डॉ.प्रतीक्षा मेश्राम (वैद्यकीय अधिकारी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र दत्तापूर धामणगाव रेल्वे) डॉ संदीप दुबे(समुदाय आरोग्य अधिकारी) डॉ.सविता  आपतुरकर (समुदाय आरोग्य अधिकारी) डॉ.प्राजक्ता वानखडे (समुदाय आरोग्य अधिकारी) डॉ. प्रीती गवई (वैद्यकीय अधिकारी झाडगाव ), जयस्वाल (आरोग्य सहाय्यक),  जोशी , मनीष निर्मुंडे कुमारी प्रशिका हगवणे (अधिपरिचारिका) श्रीमती .किरण निकम (आरोग्य सेविका) राणी राऊत (आरोग्य सेविका) , रामेश्वरी ढोरे (आरोग्य सेविका), श्री.मनोज वरकंठे (LSO) वैशाली तीरमारे (HLL), सेजल नगराळे (HLL),नूतन लवणकर (HLL) अंश घोसे (कर्मचारी) उपस्थित होते. सदर शिबिरात 200 रुग्णांची तज्ञमार्फत तपासणी करण्यात आली. 80 रुग्णांची ब्लड टेस्ट मोफत करण्यात आल्या. तसेच मोतीबिंदू रुग्ण एकूण 11 असून त्यांना पुढील शस्त्रक्रिया उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post