नाशिक,पेठ,माळेगांव : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) यांच्या मार्गदर्शनाखाली माळेगांव ता पेठ काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला AICC Observer शमिना शफिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी नाशिक जिल्हा काँग्रेसचे प्रभारी ॲड. संदीपभैय्या पाटील तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे Observer पद्माकर दादा वळवी (माजी मंत्री) उपस्थित होते. याशिवाय महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आणि प्रदेश सचिव ज्ञानेश्वर गायकवाड यांनीही बैठकीत सहभाग नोंदवला.
जिल्हा अध्यक्ष रमेश कहांडोळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांतिक सदस्य भिकाजी पाटील, तालुका अध्यक्ष गणपत चौधरी, कार्याध्यक्ष पुंडलिक चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष कैलास (बापू) भोये, सेवादल अध्यक्ष शांताराम वाघेरे, यादव भोये, युवक अध्यक्ष विवेक गवळी, महिला अध्यक्ष बेबीनंदा खंबाईत, जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई सहारे, विक्रम गायकवाड, तालुका सोशल मिडिया प्रमुख संजय भोये,श्री. जोपळे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच माळेगावचे माजी सरपंच व तालुका काँग्रेसचे पदाधिकारी भारत चौधरी यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



