अमरावती तालुक्यातील सावंगा (आसरा) येथे प्लॉटमधील आग वेळीच विझवून मोठा अनर्थ टळला.
शिराळा,पवन पाटणकर:- नजिकच्या सावंगा (आसरा) येथील एका प्लॉटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्यानंतर काही वेळातच परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र स्थानिक युवकांनी वेळीच धाडस आणि सतर्कता दाखवत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सर्वांनी एकत्रित प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली आणि विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रसंगी युवकांनी दाखवलेले धाडस, जबाबदारी आणि एकजूट कौतुकास्पद ठरली.
या घटनेत महेंद्र कल्हाने, भावेश खेडकर, संजय खेडकर, लखन कल्हाने, विक्की खेडकर, प्रफुल्ल खेडकर, अर्णव खेडकर, अंशू कल्हाने यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्थानिक नागरिकांकडून सर्व सहकार्य करणाऱ्या युवकांचे कौतुक करण्यात येत आहे.
