Amaravati News :
अंबाई बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यावतीने कांचन रिसॉर्ट , अमरावती येथे राखी मेश्राम सुरजूसे यांना नृत्य व कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल "राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मातृ सन्मान" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, विशेष म्हणजे त्यांच्या या यशस्वी वाटचालीतील प्रेरणास्थान असणाऱ्या त्यांच्या मातृ शक्ती यशोदा बाबूलाल मेश्राम यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.
राखी मेश्राम( सुरजूसे ) या सध्या प्राचार्य पदावर कार्यरत असून अगोदरही त्यांना अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांनी या अगोदर सोनी टीव्हीवरील क्राइम पेट्रोल, या मालिकेमध्ये अभिनय केलेले असून बुगी बुगी, क्या मस्ती क्या धूम, अशा अनेक डान्स रियालिटी शोमध्ये प्रथम क्रमांक मिळवले आहे. पुढे त्या मराठी चित्रपटात सुद्धा अभिनय करणार आहे.
या कार्यक्रमांमध्ये अमरावती येथील आमदार सुलभाताई खोडके, कांचन ताई उल्हे, संजीवनी काळे, दिलीप काळे, नोबेल पुरस्कार नामांकित शंकर अंदानी, अध्यक्षा माधुरी चव्हाण यांच्या हस्ते राखी व त्यांच्या आई यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका यशस्वी स्त्री मागे आई-वडिलांचा आशीर्वाद असतोचं, पण लग्नानंतर पतीची साथ असली तर कुठलीही खडतर वाटचाल अगदी सोपी होते. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे त्यांचे पती धिरज सुरजूसे व त्यांच्या आई वडील बाबूलाल मेश्राम व यशोदा मेश्राम यांना त्या आपल्या यशाचे श्रेय देतात.नृत्य, कला, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात त्या असेच कार्य करत राहील, असे प्रतिपादन राखी यांनी केले.

