किनवट–माहूर तालुक्याचा अभिमान : रवि राठोड यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड









नांदेड :- किनवट–माहूर तालुक्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रवि भाऊ उत्तम राठोड यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यासह संपूर्ण मराठवाडा विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष. बाबुराव राठोड साहेबांच्या हस्ते उदगीर येथील कार्यालयात अधिकृत नियुक्तीपत्र देऊन रवि उत्तम राठोड यांच्या निवडीची घोषणा केली. समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उचलून प्रश्नांचा छडा लावणारे तसेच युवकांना संघटित करून सामाजिक चळवळींना बळ देणारे नेतृत्व म्हणून रवि उत्तम राठोड यांची ओळख आहे.

किनवट–माहूर परिसरात शिक्षण, सामाजिक न्याय,आरोग्य तसेच वंचित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी व समाजातील ज्येष्ठ लोकांकडून आशिर्वाद रुपी शुभेच्छा व अभिनंदन सर्व स्तरावरून केले जात आहे. समाजातील स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा प्रदेशात संघटनेचे कार्य अधिक बळकट व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रवि उत्तम राठोड यांनी या निवडीबद्दल संघटनेचे आभार मानत, “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजाच्या प्रत्येक समस्या सोडवण्या साठी तसेच बंजारा समाजाच्या न्याय हक्कांसाठी अधिक जोमाने काम करणार,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post