निलेश रामगावकर जिल्हा प्रतिनिधी
चांदूर रेल्वे :- आपल्या कर्तव्यावरून घरी परत जात असताना मांजरखेड येथील अपघातग्रस्त मुलींच्या मदतीला धावल्या चांदुर रेल्वे येथील वनविभागाच्या आर एफ ओ शितल पुंडे मॅडम. आपल्या कर्तव्यावरून परत जात असताना पोहरा नजीक नदीच्या पुलानजिक दोन मुली अमरावती वरून ज्युपिटर बाईकने मांजरखेड येथे आपल्या घरी परत येत असताना त्यांना अपघात झालेला दिसला त्यावेळी त्यांनी समस्त परिस्थिती जाणून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्या मुलींना अमरावती येथील लाहोटी हॉस्पिटल येथे पोहोचविले. जखमींचे नाव देशमुख व वानखेडे असे आहे . मॅडमच्या मदतीला भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार धनजोडे व तळेगाव दशासर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी अविष कावळे, पंकज पेटकर, संतोष बगाडे यांनी सुद्धा माणुसकीचे दर्शन देत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. व अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू होत पर्यंत त्याच ठिकाणी उपस्थित राहिले.

