मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)लाड-पागे समिती शिफारसीनुसार पर्जंन्य जलनि:निमार्ण(SWD) खात्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या एका पाल्याला मुंबई महापालिकेत नोकरी देण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी नुकताच मुंबई येथे महापौर रितू तावडे यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
महापौर रितू तावडे यांनी असे निदर्शनास आणून दिले कि,लाड-पागे समिती आयोग हा महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत येत आहे.तरीही आयुक्तांना मी पत्र देऊन लाड-पागे समिती शिफारसीनुसार धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कामगारांसमवेत मिटींग घेऊन चर्चा करण्यात येईल असे आश्वासन महापौरांनी दिले.तसेच सातव्या आयोगानुसार कामगारांचे पे फीक्सेशन व्यवस्थित न झाल्याने सेवानिवृत्त कामगारांना ग्रॅज्युएटी व पेन्शन कमी प्रमाणात मिळालेली आहे,हा प्रश्नही महापौर समोर उपस्थित करण्यात आला.
यासंदर्भात खात्यांतर्गत अधिकारी व पेन्शन डीपार्टमेंटचे अधिकारी यांची स्वतंत्र बैठक लावून या विषयावर सविस्तर चर्चा करुन प्रश्न सोडविण्यात येईल असे महापौर रितु तावडे यांनी सांगितले.एकुणच महापौरांसमवेत व्यवस्थित, मुद्देसूद, सकारात्मक चर्चा झाली.याप्रसंगी बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
