वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील अशोक नगर येथे पहिली सम्राट अशोक जयंती साजरी.
सहाय्यक संपादक कैलास बनसोड
वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथील अशोक नगर येथे प्रथम चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक (इ.स.पू. २६८-२३२) हे मौर्य वंशातील एक अत्यंत पराक्रमी आणि उदार सम्राट होते, ज्यांनी भारताच्या इतिहासात 'अशोक महान' म्हणून स्थान मिळवले. कलिंग युद्धातील हिंसाचार पाहून त्यांनी शस्त्रसंन्यास घेऊन बौद्ध धर्म स्वीकारला आणि अहिंसा, शांती व मानवतेचा प्रसार केला . त्यांनी धम्माच्या आधारे लोककल्याकारी राज्य केले. त्याचा आदर्श घेण्याची गरज समजून चक्रवर्ती सम्राट अशोक राजा यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रामुख्याने सम्राट अशोक यांच्या जीवनावर आधारित महेंद्र गुडदे ,आर. सी कांबळे , व्ही. ए न कांबळे , प्राध्यापक रमेश गुडदे , यांनी प्रकाश टाकला या कार्यक्रमासाठी नगर सेवक सोनाजी घुगे वॉर्ड क्रमांक 3 यांची उपस्थिती होती यासह परिसरातील जागृत महिला पुरुष यांनी गर्दी केली होती.
चक्रवर्ती सम्राट अशोक यांची पहिलीच जयंती साजरी झाली त्या निमित्याने येथे एक बौद्धी वृष लाऊन त्याला जतन करण्याची जबाबदारी घेऊन त्याबाबत चित्रीकरण केले आहे जेणेकरून येणाऱ्या वर्षी ही मोठ्या प्रमाणावर उत्साहित होऊन साजरी होईल अशा आशा व्यक्त केल्या आहेत.
