Gavakadachibatmi • आम्ही मावळे ग्रुप यांची कौतुकास्पद कामगिरी

  




रोड अपघातात मरण पावलेल्या वानराचा अंत्यविधी करून दिले माणुसकीचे दर्शन


प्रतिनिधी,निलेश रामगावकर 

तळेगाव  दशासर :- स्थानिक येथील लगत असलेल्या छत्रपती संभाजीनगर - नागपूर महामार्गावरील तळेगाव - देवगाव मार्गावर आज दुपारी ऐका अज्ञात ट्रक नी वानराला धडक दिली, व या धडकेत वानर जागीच ठार झाले.

याची माहिती कळताच तळेगाव दशासर येथील आम्ही मावळे ग्रुप यांनी घटनास्थली धाव घेऊन जखमि झालेल्या वानराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली . व त्यानंतर त्या वानराला मृत घोषित करण्यात आले. यानंतर विधिपुर्वक पूजन करून त्या वानराला माती देण्यात आली. यामुळे आम्ही मावळे ग्रुप या संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post