अमरावती, दि. ०१ मार्च २०२६ :महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (महा. अनिस) अमरावती जिल्हा व शहर शाखेची पाक्षिक बैठक गुरुदेव सेवाश्रम, राधानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त उत्साहात संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सतीश तराळ (उपाध्यक्ष, महा. अनिस अमरावती) होते.
मार्गदर्शक म्हणून प्रवीण वासनिक (पर्यावरणप्रेमी, अमरावती), विजय डवरे (जिल्हा प्रधान सचिव, महा. अनिस अमरावती) व प्रफुल्ल मंदा श्रीधर (जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अनिस अमरावती) उपस्थित होते.
प्रारंभी मागील बैठकीचा अहवाल सादर करण्यात आला व त्यास अनुमोदन देण्यात आले.
बैठकीत शाखा बांधणी संदर्भात सविस्तर चर्चा करून आतापर्यंत ९ शाखांची स्थापना पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली.
ग्रामीण व शहरी भागात संघटन विस्तारासाठी लवकरच विशेष शाखा बांधणी दौरा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी येणारी होळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले. अनावश्यक वृक्षतोड टाळणे, कमी प्रमाणात होळी प्रज्वलित करणे, प्रदूषणमुक्त सण साजरा करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना अन्नधान्य व वस्त्रदान करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.
सणांच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन व पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
तसेच विविध जनजागृती उपक्रम, कार्यशाळा व संविधान जागर अभियानाची रूपरेषाही यावेळी निश्चित करण्यात आली. पुढील पाक्षिक बैठक शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी गुरुदेव सेवाश्रम, राधानगर येथे घेण्याचे ठरविण्यात आले.
या बैठकीस प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, नरेंद्र धर्माळे, मनिष गणेशपुरे, विजया करोले, सचिन खोब्रागडे, दिगंबर मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीचा समारोप “विवेकाचा आवाज बुलंद करूया – जय संविधान” या घोषणांनी करण्यात आला.
Tag : #Amravati #Mahaanis #Meeting #EnvironmentalPurkaHoli #Holi #Environment #MorningNews #HappenedinMaharashtra #AmravatiCity #SocialWork #EnvironmentalPreservation #Awareness #Enthusiasm #SocialMessage #MarathiNews #अमरावती #महाअनीस #बैठक #पर्यावरणपूरकहोळी #होळी #पर्यावरण #सकाळवृत्त #महाराष्ट्रातघडले #अमरावतीशहर #सामाजिककार्य #पर्यावरणसंवर्धन #जागरूकता #उत्साह #सामाजिकसंदेश #मराठीबातम्या
