अमरावती, देवेंद्र भोंडे : म.न.पा. उच्च प्राथमिक शाळा क्र. 13, कॅम्प, अमरावती येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका चित्रा खोब्रागडे मॅडम होत्या.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश मेंढे सुपर हॉस्पिटल,निलेश ठाकरे,मोहनसिंग राठोड,ऋषिकेश धस,आशा बानोडे,भूमिका रंगारी,प्रियांका गजभिये,प्रीती गुळधे, सुरज घायवाट व पंकज रंगारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमेय रंगारी यांनी केले,तर आभार प्रदर्शन प्रणाली मॅडम यांनी केले.
प्रमुख अतिथी डॉ.मंगेश मेंढे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,शिक्षणासाठी पैसा किंवा प्रतिकूल परिस्थिती अडथळा ठरत नाही;मोठी झेप घेण्यासाठी जिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वास आवश्यक असतो.त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
हा संपूर्ण कार्यक्रम विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय,अमरावती येथील अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या सामाजिक बांधिलकीमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल सर्व मान्यवर, शिक्षकवृंद, कर्मचारी व उपस्थितांचे शाळेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
Tag : #मनपा_उच्च_प्राथमिक_शाळा_13 #शालेय_साहित्य_वाटप #शैक्षणिक_उपक्रम #मदत_कार्य #विद्यार्थी_कल्याण #शिक्षण_विकास #गरजू_विद्यार्थी #शाळा_आधार #मुलभूत_सुविधा #पुणे_मनपा #शिक्षण_प्रेमी #समाजसेवा #मराठी_माध्यम #महाराष्ट्र #education

