किनवट तहसिल कार्यालयांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

 


सिंदगी (मोहपुर ) ता, किनवट येथे 

 दिनांक,१४: मार्च रोजी,

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन

लाभार्थी गावातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा..

2. शिबिराची तारीख: १४/०३/२०२६.

3. शिबिराचे ठिकाण= सिंदगी[ मो]

   4. लाभार्थी गावे : सिंदगी मो, मोहपूर, राजगड, राजगड तांडा, वडोली, निचपुर, माळबोरगाव, धामणदरी, कणकवाडी, लोणी, मारेगाव वरचे, मारेगाव खालचे पांधरा, बेलोरी, अंजी

5. शिबिरात मिळणाऱ्या महसुली सेवा•

    - प्रमाणपत्रे आणि दाखले (प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेर प्रमाणपत्र, पी.एम. किसान नोंदणी, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, भु विकास बँकेच्या कर्जाची नोंद कमी करून झालेला सातबारा वितरण).

    - जमीन अभिलेख अद्यावतीकरण (अकृषिक (NA) तरतुदीबाबत, मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापन 'सनद' प्रक्रियेची माहिती, तुकडेबंदी उल्लंघनाच्या प्रकरणांचा निपटारा, भू संपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी 'कमी-जास्त' पत्रके तयार करून गाव दसरा अद्यावत केली जाणार).

    - सरकारी योजनांचा लाभ (सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी).

5. नागरिकांना सूचना : नागरिकांनी मंडळ भागातील शिबिर दिनांकापूर्वी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्याकडे हव्या असलेल्या सेवेचे अर्ज जमा करावे.

Post a Comment

Previous Post Next Post