मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वच्छता दूत राष्ट्रसंत सदगुरू साईनाथ महाराज वसमतकर यांची भेट

 


               छायाचित्र ईलीयास बावानी माहूर


ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यानंतरचा पूर्ण कार्य अहवाल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर..


विशेष प्रतिनिधी/अनिल बंगाळे 

श्रीक्षेत्र माहूर : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे मठाधीश राष्ट्रसंत सदगुरू साईनाथ महाराज वसमतकर यांनी मंत्रालय, मुंबई येथे भेट घेत स्वच्छतेबाबत केलेल्या कार्याचा कार्यअहवाल सादर केला


या भेटीदरम्यान महाराष्ट्रभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता जनजागृती राज्यातील आयटीआय प्रशिक्षण संस्था होत असलेल्या प्रशिक्षण जनजागरण स्वच्छता गिरनार पर्वतावर होणाऱ्या सप्ताह स्वच्छता अभियानाची तसेच सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आली. तसेच स्वच्छतेचे प्रतीक म्हणून झाडू व दत्तप्रभूंची प्रतिमा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.


राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी समाधान व्यक्त करत तंबाखू मुक्ती स्वच्छता अभियान महिला सक्षमीकरण वृक्ष लावगड व्यसन दहन कार्यक्रम शालेय शिक्षण अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व ह्या पेन पुस्तके वाटप यासह अनेक राबविण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.

यावेळी महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छता व ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांचे सोबत निजशिष्य प्रल्हाद देवडे इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post