आदिवासी ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांना नंदिनी टारपे यांची उपस्थिती

 




किनवट तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यांना  नंदिनी टारपे यांची उपस्थिती

किनवट तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात पार पडलेल्या विविध मंगलमय विवाह सोहळ्यांना आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष तसेच नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षा नंदिनी टारपे यांनी उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभ आशीर्वाद दिले.

समाजातील सुख-दुःखाच्या प्रसंगात सहभागी होण्याची परंपरा जपत त्यांनी किनवट तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन विवाह सोहळ्यांना उपस्थिती लावली. या वेळी किनवट येथील खोकले / लाखाडे परिवार तसेच चिरमाडे / बेले परिवार, टिंगणवाडी येथील हुरदुके / गारोळे परिवार आणि दरसांगी येथील तरटे परिवार यांच्या मंगलमय विवाह सोहळ्यांना त्यांनी भेट दिली.

विवाह सोहळ्यादरम्यान त्यांनी वधू-वरांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचे वैवाहिक जीवन प्रेम, आनंद, समाधान, समृद्धी आणि सुख-शांतीने परिपूर्ण होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली. तसेच या मंगल प्रसंगी दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींना भेटून त्यांचे अभिनंदन केले व सर्व कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आदिवासी ग्रामीण भागातील सामाजिक ऐक्य, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील अशा सामाजिक कार्यक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना दृढ होते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनीही त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी सातत्याने कार्य करण्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

Post a Comment

Previous Post Next Post