अमरावती थॅलेसेमिया निर्मुलन समिती, अमरावतीचे अक्षय वैद्य यांना पद्मश्री वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता पुरस्कार प्रदान

 




प्रतिनिधी,निलेश निंबाळकर  


अमरावती / वरूड  : सामाजिक कार्यात व रक्तदानाच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेले व अमरावती थॅलेसेमिया निर्मुलन समिती, अमरावातीचे अक्षय वैद्य यांना रक्तदानाच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल तसेच थॅलेसेमियाग्रस्तांना नियमित रक्ताचा पुरवठा करण्याची अमूल्य कार्य करीत असल्याबद्दल व रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदात्यांकडून रक्त संकलन करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल  उत्तरप्रदेश मधील दुद्धी येथे प्रगती फाऊंडेशन ट्रस्ट, दुद्धी, सोनभद्र द्वारा नुकताच आयोजित वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता सन्मान समारोह मध्ये वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता पुरस्कार पद्मश्री लौंगी भुइया, दुद्धी नगर पालिका अध्यक्ष तथा माजी आमदार रुबी प्रसाद, माजी आमदार हरिराम शेरू, ओडीसा येथील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी संज्युक्ता चॅटर्जी आचार्य यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगती फाऊंडेशन ट्रस्ट, दुद्धी अध्यक्ष विकासकुमार अग्रहरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात आला. 




या प्रसंगी विजयकांत चौहान यांच्यासह रक्तदानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक देशातील सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. अक्षय वैद्य यांना वीर बिरसा मुंडा आंतराष्ट्रीय रक्तदाता पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे ऑरेंजसिटी थॅलेसेमिया निर्मुलन समिती, वरुड तसेच अमरावती थॅलेसेमिया निर्मुलन, अमरावतीचे  सर्व पदाधिकारी व सदस्यांसह विविध क्षेत्रातील संस्था, संघटना, नागरिक तसेच मित्र परिवार तर्फे त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post