छायाचित्र ईलीयास बावानी माहूर
प्रशांत राठोड च्या भेटीतून सर्वधर्मसमभाव चा संदेश
सर्व धर्मीयांच्या सण उत्सवात सहभागी होत असल्याने प्रशांत राठोड नावांचीच चर्चा
श्रीक्षेत्र माहूर : मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांचा प्रवास लोकनेते या शब्दाला साजेसा सुरू असल्याने तालुक्यासह मुंबईत आलेल्या सर्व धर्मीयांना प्रत्येक कामात मदत करणे यासाठी त्यांचे नाव दोन्ही तालुक्यात प्रथम क्रमांकावर चर्चिले जात असल्याने सर्व धर्मीयांच्या सण-उत्सवासह लग्न निधन तसेच कुठलीही जयंती पुण्यतिथी सामाजिक कार्यात कोणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता मदत करण्यासाठी हजर राहत असल्याने झालेल्या रमजान ईद निमित्त माहूर शहरात येऊन त्यांनी सर्वसामान्य मुस्लिम बांधवांसह गन मान्य नागरिकांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्याने शहरात सध्या त्यांच्याच नावाची चर्चा होताना दिसत आहे.
माहूर किनवट तालुक्यात प्रशांत राठोड यांनी वृक्ष लागवडीपासून जंगलात जंगली जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्धते पासून ते जात धर्म न पाहता अनाथ मुलींचे लग्न पुण्यतिथी जयंती सार्वजनिक कामांचे मेळावे तसेच भाईचारा सर्व धर्म समभाव टिकून राहावा यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न असतात सुट्टीच्या दिवशी वेळ वाया न घालवता तालुक्यातील छोटे मोठे लग्न समारंभ किंवा सामाजिक होत असलेल्या सर्व कार्यात कुठल्याही निमंत्रणाची मानपानाची वाट न पाहता ते हजर राहून सर्व धर्मीयांना सढळ हाताने मदत करत असतात.
पवित्र रमजान ईद निमित्त त्यांनी थेट माहूर शहर गाठून शहरातील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा सन्माननीय नागरिक कादरभाई दोसानी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सरफराज दोसानी प्रतिष्ठित व्यापारी सलीम भाई, खाकरा यासीन भाई बाणानी तास किराणा चे संचालक इसाक भाई पत्रकार रफिक भाई गाईड शेख, साबीर शेख, उस्मान नगरसेवक प्रतिनिधी निसारभाई कुरेशी फिजा जनरल स्टोअर्स चे संचालक जाबीर भाई आतार फिरोज भाई अप्सरा जनरल स्टोअर चे संचालक आयुब भाई उस्मान भाई बत्ती वाले महमूद भाई, शब्बीर भाई, रहीम किराणाचे चे संचालक रहीम भाई, आरिफ भाई यांचे सह ताज किराणाचे संचालक वसीम भाई सहारा स्टील येथे सौदागर यांचे सह शेकडो मुस्लिम बांधवांची त्यांनी यावेळी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या माहूर शहरासह वाईबाजार येथील हाजी उस्मान खान चांदखान पठाण यांचे सह शेकडो मुस्लिम बांधवांना त्यांनी भेट घेत गोंडवाडसा येथीलही मुस्लिम बांधवांची भेट घेतली.
यावेळी त्यांचे सोबत श्री दत्तकृपा टी स्टॉलचे संचालक विजय कांबळे किसन राठोड, पत्रकार दत्तात्रय शेरेकर, दिनेश पवार ,बंडू राठोड, प्रदीप पवार, रवि वायकुळे, संजय गायकवाड, बोधडी चे अशोक राजूरवार करण गेडाम यांचे सह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते..


