मूर्तिजापूर तरोडा येथे आधार काठी वाटप व सत्कार समारंभ..!

 

Gavakadachibatmi

कर्मयोगी फाउंडेशन व भरारी पुरुष बचत गट (आत्मा )यांचा संयुक्त उपक्रम ...!


तिवसा,कुऱ्हा = : कुऱ्हा येथून जवळच असलेल्या मूर्तिजापूर तरोडा येथे कर्मयोगी फॉउंडेशन (ब्रीद वाक्य --बोलते नव्हे, तर कर्ते व्हा )व भरारी पुरुष गट यांचे संयुक्त विद्यमाने कर्मयोगी गाडगेबाबा यांचे जयंती साप्ताहनिमित्य विविध उपक्रम राबविण्यात आले.



   कर्मयोगी गाडगेबाबा यांचे जयंती साप्ताहनिमित्य स्वछता अभियाना अंतर्गत गावातील मुख्य बाजार चौकापासून ते श्री हनुमान मंदिरा पर्यंत परिसर स्वच्छ करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

          दुसऱ्या सत्रात श्री. हनुमान मंदिरामध्ये कर्मयोगी फौंडेशन तर्फे वृद्ध, अपंग, व निराधार व्यक्तींना जवळपास चाळीस आधार काठीचे पाहुण्यांचे हस्ते वाटप करण्यात आले. आधार काठी म्हणजे वस्तूचे वितरण नसून "सेवा हिच खरी पूजा ''अंतर्गत समाजातील जेष्ठ व गरजू नागरिकांप्रती कृतज्ञन्ता, व जबाबदारी घेण्याचा मानस व गरजूच्या चेहऱ्यावर हसू फुलविणे हाच उद्देश पुढे ठेऊन आधार काठी वाटप करण्यात आले.



त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विनोद तितरे. उदघाटक अनिल बगाडे, प्रमुख पाहुणे. संजय कांबळे (मार्गदर्शक. कर्मयोगी फॉउंडेशन ), प्रफुल्ल कोल्हे., पंकज  गायकवाड, रुपेश  तितरे, स्वप्नील भापकर, नागेश लुटे तालुका अध्यक्ष कर्मयोगी फॉउंडेशन, गोपाळ भापकर. विनोद तितरे विशाल ठाकरे, काजळकर मॅडम, अशोकराव पवार सचिव अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ.तसेच ह. भ. प. कु. भूमिकाताई रवींद्र तिरमारे व रविंद्र तिरमारे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले.

      दुसऱ्या सत्रात मूर्तिजापूर तरोडा येथील बाल कीर्तनकार ह भ. प. कु भूमिकाताई रवींद्र तिरमारे ही ही एक कमी वयात आपल्या ओजस्वी, सुमधुर वाणीतून समाज प्रबोधन करून पूर्ण विदर्भ, व मध्यप्रदेश मध्ये कीर्तन, कथावाचन करीत आहे. हे कार्य गावाकरिता भूषणवाह, व अभिमानाचे आहे म्हणून कर्मयोगी फॉउंडेशन व भरारी पुरुष बचत गट यांचे संयुक्त विद्यमाने कु. भूमिकाताई व तिचे वडील रवींद्र तिरमारे यांचा शाल, श्रीफळ, विठ्ठल रुख्मिणी प्रतिमा, व ग्रामगिता देऊन गौरविण्यात आले.

 नंतर कर्मयोगी फॉउंडेशन मूर्तिजापूर तरोडा कार्यकारिणी घोषित करण्यात आली, त्यामध्ये अभिजित शिर्के अध्यक्ष, मंगेश बाहे उपाध्यक्ष, अमोल वेरूळकर सचिव, अक्षय सहारे, शंकर सहारे, प्रशिक गजभिये, रोशन गुजर, सुरज शिर्के, सुरज पडोळे, संजय कांबळे, प्रफुल्ल कोल्हे सदस्य म्हणून निवड करण्यात आली..

      त्यानंतर कर्मयोगी फॉउंडेशन तर्फे जी. प. पूर्व माध्य. मराठी शाळा मूर्तिजापूर येथे वर्ग 1ते वर्ग 7वी पर्यंत च्या विध्यार्थी ना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी शाळेच्या शिक्षिका सावरकर मॅडम, तायडे मॅडम उपस्थित होत्या. अशाप्रकारे कर्मयोगी फॉउंडेशन व भरारी बचत गट मूर्तिजापूर तर्फे आयोजित आधार काठी वाटप व सत्कार समारंभ संप्पन झाला. कार्यक्रमाचे संचालन अमोल वेरूळकर. व प्रास्ताविक व आभार प्रदर्शन संजय कांबळे यांनी केले. यावेळी गावातील पुरुष, महिला, व बालगोपालांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Tag : #KarmayogiFoundation #BharariPurushBachatGat #Atma #SamyuktaUpakram #SocialInitiative #CommunityDevelopment #Empowerment #Maharashtra #SelfHelpGroup #SocialWork #RuralDevelopment #Collaboration #NGO #LocalCommunity #PositiveImpact

Post a Comment

Previous Post Next Post