गावाकडची बातमी| माध्यमिक कन्या विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन

 

Gavakadachibatmi


प्रतिनिधी निलेश रामगावकर 

 तळेगाव दशासर :  कृषक सुधार मंडळ द्वारा संचलित माध्यमिक कन्या विद्यालय तळेगाव दशासर येथे दिनांक 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यार्थिनी करिता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.शाळा स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.तसेच निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.यामध्ये वर्ग 5 ते 9 च्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.थोर शास्त्रज्ञ डॉ सी. व्हि. रमण यांच्या फोटोचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापिका मंजुषा देशमुख यांनी विज्ञान दिनाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post