जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून"पालवी महिला जेष्ठ नागरिक संघ"आयोजित मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न

 

पुणे




 पुणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)वयाला मर्यादा नसते, उतारवयातही महिलांचा उत्साह दांडगा असतो.महिलांच्या उत्साहाचे मोल अगणित आहे,त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून"पालवी महिला जेष्ठ नागरिक संघ,आकुर्डी, या संस्थेच्या संस्थापिका-अध्यक्षा शोभा जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कबीर बाग उद्यान आकुर्डी येथे महिलांसाठी मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.या कार्यक्रमासाठी उपमहापौर सौ.शैलजा मोरे तसेच नगरसेविका वैशाली काळभोर या उपस्थित होत्या.तसेच या कार्यक्रमासाठी ॲड.अनिशा फणसळकर समुपदेशक व सायकोथेरपीस्ट प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.सदरील कार्यक्रमात सर्व सभासदांसाठी चिठ्ठी उचलून बक्षीस या धर्तीवर सर्वांना बक्षीस देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमाअंतर्गत स्वतःला शांत ठेवून मन एकाग्र करुन आपल्या आयुष्यातील आनंद कसा वाढवावा यासाठी ॲड.अनिशा फणसळकर यांनी सर्व महिला सभासदांना मार्गदर्शन केलेच तसेच प्रत्यक्ष व्हिज्युलाईज मेडिटेशन देऊन एका वेगळ्या अनुभवाची अनुमती देखील प्राप्त करून दिली.संस्थेतील सर्व सभासद महिला ६०ते८०या वयोगटातील होत्या मात्र त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्यासाठी पुन्हा आणि वारंवार घ्या अशी सूचना केली.सदर कार्यक्रमाची सांगता सुग्रास अशा भोजनाने झाली.

Post a Comment

Previous Post Next Post