जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती – स्थानिक हिम सोसायटी (Humanity Education and Multipurpose Society), अमरावती यांच्या वतीने दिनांक 29 मार्च 2026 रोजी महिला दिनाच्या औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात श्रीमती सुनंदा मानकर (इंगळे)यांना ‘राज्यस्तरीय स्त्री सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
श्रीमती मानकर या 1995 पासून आरोग्य सेवेत कार्यरत असून त्यांनी आपल्या सेवाकाळात जिल्हा रुग्णालय गोंदिया, स्त्री रुग्णालय अमरावती, जिल्हा रुग्णालय अमरावती तसेच ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे उल्लेखनीय सेवा बजावली आहे. सध्या त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे सिनियर नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.
आरोग्य क्षेत्रात त्यांनी केलेल्या उत्कृष्ट, समर्पित व उल्लेखनीय कार्याची दखल घेत हिम सोसायटीतर्फे त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे..
