छायाचित्र- ईलीयास बावानी माहूर
श्रीक्षेत्र माहूर :- आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत घरगुती एलपीजी गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी माहूर तहसील प्रशासन सतर्क झाले असून माहूर तालुक्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालय, चहा कॅन्टीन यांच्या तपासण्या सुरु सुरू करण्यात आले असून हॉटेल्स मध्ये व्यवसायीक सिलेंडरच वापरावे घरगुती सिलेंडर वापरू नये अशा सक्त सूचना तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाद्वारे देण्यात येत आहेत.
तालुक्यातील गॅस एजन्सीज यांना कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेला घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा करू नये. तसेच काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि ऑनलाईन ओ टी पी द्वारे घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा ग्राहकांना करण्यात यावा. या कामामध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार आपलेवर योग्य ती कारवाई करण्यात येऊन गुन्हा नोंदविण्यात येईल अशा सूचना महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तहसीलदार अभीजित जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राऊत निरिक्षण अधिकारी गजेंद्र मिरजगावे पुरवठा निरीक्षक संतोष पहुरकर पुरवठा लिपिक श्रीमती पूनम मांडवगडे पुरवठा लिपिक हे सर्व हॉटेल्स वर जाऊन ऑनलाईन ओटीपी द्वारे गॅस सिलेंडर प्राप्त करून घ्यावे. काही अडचणी असल्यास संबंधित गॅस एजन्सीज यांचेशी संपर्क साधावा.तालुक्यात घरगुती एलपीजी गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊन अनावश्यक साठेबाजी करू नये. असे आवाहन करीत आहेत..
..........................................
गॅस सिलिंडरचा काळाबाजार, अवैध साठवणूक तसेच गैरवापर यावर प्रभावी आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी याबाबत सतर्क राहून सहकार्य करावे.
अभिजीत जगताप
तहसीलदार तहसील कार्यालय माहूर

