छायाचित्र -ईलीयास बावानी
सर्वसामान्यांचा आधारवड प्रशांत राठोड यांनी बहुचर्चित कनिष्क वानखेडे उर्फ छोटू दादा यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण
विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरासह तालुका भरात प्रसिद्ध असलेले तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांचे कट्टर समर्थक शिवसेना उभाठा गट शिवसेनेचे चर्चेत असलेले कार्यकर्ते कनिष्क वानखेडे उर्फ छोटू दादा यांचे नुकतेच लग्न पार पडले त्यानिमित्त सर्व सामान्यांचे आधारवड मंत्रालयीन सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत बराच वेळ राजकीय सामाजिक विषयावर चर्चा केल्याने माहूर शहरात प्रशांत राठोड आणि छोटू दादांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
कनिष्क वानखेडे उर्फ छोटू दादा नावाने प्रसिद्ध असलेले कनिष्क वानखेडे उर्फ छोटू दादा त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने समाजसेवेचा वसा घेतलेले मंत्रालय सनदी अधिकारी प्रशांत राठोड यांनी त्यांचे घरी जाऊन भेट घेत वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले तसेच बराच वेळ सामाजिक राजकीय विषयावर चर्चा केली त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले असून छोटू दादांना मानणारे असंख्य कार्यकर्ते असल्याने त्यांनीही यावेळी येऊन प्रशांत राठोड यांची भेट घेत छोटू दादांचे अभिनंदन केले.
यावेळी प्रशांत राठोड यांचे सह कनिष्क वानखेडे ऊर्फ छोटू दादा नववधू कोमल गजानन चवरे ,आई नबुबाई वानखेडे वडील देविदास वानखेडे ,आम्रपाली प्रशांत हणवते, स्वप्नाली प्रमोद जाधव, श्री दत्तकृपा स्टॉलचे संचालक विजय कांबळेबंडू राठोड गजानन शद्दलवार प्रमोद राठोड, प्रदीप पवार, राजू पवार ,रवि वायकुळे, करण गेडाम यांचे सह गणमान्य उपस्थित होते.
