सारखणी | विराट हिंदू संमेलनात लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतर थांबविण्याची गरज - महन्त जितेंद्र महाराज पोहरागड

सारखणी येथे आयोजित विराट हिंदू संमेलनात लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतर थांबविण्याची गरज - महन्त जितेंद्र महाराज पोहरागड

नांदेड

सारखणी येथे दिनांक २८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विराट हिंदू संमेलनामध्ये विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या संमेलनाला अखिल भारतीय धर्म जागरण प्रमुख श्री. शरदराव ढोले तसेच पोहरागड येथील महंत जितेंद्र महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी श्री. शरदराव ढोले यांनी सामाजिक समरसता, पर्यावरण संवर्धन, नागरिक शिष्टाचार, कुटुंब प्रबोधन आणि स्वबोध या पंचपरिवर्तनाच्या महत्त्वपूर्ण विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महंत श्री जितेंद्र महाराज पोहरागड यांनी आपल्या भाषणात लव्ह जिहाद व सक्तीचे धर्मांतर यांसारख्या विषयांवर समाजाने जागरूक राहून एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. समाजातील ऐक्य, संस्कार आणि जागृती यांच्या माध्यमातून अशा प्रवृत्ती थांबविता येऊ शकतात, असे त्यांनी प्रतिपादन केले. सुत्रसंचलन व आभार श्रीनिवास उईके यांनी केले तसेच कार्यक्रम सुरळीत व शांततेने पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन सिंदखेड चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री रमेश जाधवर साहेब यांनी पोलीस बंदोबस्त लावला होता. 

या विराट हिंदू संमेलनास परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली असून कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post