बलात्काराला शिक्षा..! ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
बलात्कार करणारा गुन्हेगार अपराध करताना पीडितेचं वय, तिची अवस्था, तिचं आयुष्य — काहीच पाहत नाही. मग शिक्षा देताना त्याच्या वयाचा विचार का करायचा?
आम आदमी पार्टीचे AAP खासदार राघव चड्डा raghav chadha यांनी अत्यंत महत्त्वाचा आणि जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा मांडला आहे.
यांनी मांडलेला हा मुद्दा आजच्या समाजासाठी खूप महत्त्वाचा आहे. गुन्हा किती गंभीर आहे, त्याचा पीडितेवर आणि समाजावर किती खोल परिणाम होतो — हे पाहणं गरजेचं आहे, गुन्हेगाराचं वय नाही. हेच आज पर्यंत सिद्ध झालेला आहे ज्याप्रमाणे त्याला जात नसते त्याप्रमाणे त्याला वयसुध्दा नसतं
आज अनेक वेळा आपण पाहतो की अल्पवयीन Minor असल्याच्या कारणावरून कठोर शिक्षा टाळल्या जातात. पण जेव्हा गुन्हा अमानुष असतो, तेव्हा न्यायही तितकाच कठोर असायला हवा. कारण एका चुकीमुळे एका व्यक्तीचं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं.
समाजात भीती निर्माण व्हावी, गुन्हेगाराला धडा मिळावा आणि भविष्यात असे गुन्हे कमी व्हावेत — यासाठी शिक्षा ही वयानुसार नव्हे तर गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार ठरायला हवी.
हा मुद्दा केवळ राजकारणाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेचा आहे. आपणही विचार करा — न्याय म्हणजे नेमकं काय?
आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्डा यांच्या मताशी आपण सहमत आहात का?
