विक्रूत/बदनामी प्रसिद्धीची मनोकामना
ज्येष्ठ पत्रकार दत्ता पवार यांचे मनोगत !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मागे काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याकडून चुकून सोशल मीडियावर त्यांचे गोपनीय व्हिडिओज पडले होते परंतु काही मिनिटाच्या आत ते डिलीट केल्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
अशीच घटना भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याबाबतीत घडली होती. किरीट सोमय्या यांनी कुठल्यातरी महिलेला व्हिडिओ कॉल केले असता त्या महिलेने त्यांना काही इंन्स्ट्रक्शन दिल्या आणि त्या इन्स्ट्रक्शन त्यांनी फॉलो केल्या आणि सदर महिलेने तो व्हिडिओ रेकॉर्ड करून व्हायरल केला होता.
आणि एकच खळबळ उडाली होती. नंतरच्या कालखंडामध्ये खरात प्रकरण घडलं आणि शेकडो व्हिडिओ बाहेर आले. आता माझी मंत्री नरहरी झिरवळ यांचे काही व्हिडिओ सोशल माध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे नरहरी झिरवळ यांची समाजात छी थु होत आहे. नरहरी झिरवळ या माणसाला गावगाड्यातील साधा आणि सरळ माणूस म्हणून समजलं जायचं परंतु त्यांच्या प्रतिमेला तडा जाईल असे काही व्हिडिओ समाज माध्यमात आले आहेत.
मुळात ही सगळी प्रतिष्ठित समजली जाणारी पॉलिटिकल लोक आहेत. यांना लाखो लोक फॉलो करत असतात. काहींना तर देव वगैरे पण मानतात. मग ही लोक आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अशी घाणेरडी कृत्य का करत असतील. सार्वजनिक जीवन जगत असताना काही मर्यादा पाळणं गरजेचं असतं. प्रत्येकाला व्यक्तिगत जीवन असतं हे जरी सत्य असलं तरी सार्वजनिक जीवनामधील सत्य हे की व्यक्तिगत जीवनातील गोष्टी समाजासमोर येणार नाहीत याची काळजी घेणं असतं तितकच गरजेचं असतं. आता नरहरी झिरवळ यांचे व्हिडिओ कोणी व्हायरल केले? ते काढले कोणी हा मुद्दा दुय्यम असून त्याच्यातून त्यांची घृणास्पद वर्तणूक अधोरेखित होते. संविधानिक पदावर बसलेले व्यक्तीसुद्धा किती लिंग पिसाट असू शकतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. फक्त हिमनगाचे टोक आहे. राजकीय जीवनात असे नालायक कृती करणारे शेकडो लोक आहेत फक्त ते समोर आलेलं नाही आणि येणार नाही हेच सत्य आहे. योगायोगाने यांच्या गोष्टी समोर आल्या.
