प्रभाग क्रमांक चार येथील नागरिकांचे ग्रामपंचायत कार्यालय व गटविकास अधिकारी धामणगाव रेल्वे यांना निवेदन
पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार
तळेगाव दशसर :- स्थानिक प्रभाग क्रमांक चार मधील निलेश शंकरराव गुल्हाने ते योगेश संजयजी शर्मा यांच्या घरापर्यंत जुनी पाइपलाइन आहे. परंतु या पाइपलाइन कनेक्शनला पाच मिनिटांपेक्षा जास्त पाणी पुरवठा होत नाही. याबाबत वारंवार पाणीपुरवठा कर्मचारी व ग्राम विकास अधिकारी यांना सूचना देऊनही आजपर्यंत यावर कोणीही लक्ष दिले नसल्याची खंत नागरिकांनी बोलून दाखविली. तसेच वॉर्ड क्रमांक चार येथे पाणीपुरवठा एक दिवस आड येत असून दिनांक 22/03/ 25 रोजी निलेश शंकरराव गुल्हाने ते योगेश शर्मा यांच्या घरापर्यंत सर्व नळ कनेक्शन ला दूषित पाणी पुरवठा झाला असल्याचे नागरिक सांगत आहे. व नळाला पाणीही पाच मिनिटांच्या वर आले नसल्याने नागरिकांनी ताबडतोब फोन द्वारे पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला याबाबतची माहिती ही देण्यात आली. परंतु याची दखल घेण्यात आली नाही ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून सदर गावकऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायत कार्यालय व गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. व पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

