माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एचपीव्ही लसीकरण मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली या मोहिमेमुळे नागरिकांचे आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे या कार्यक्रमाविषयी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी एम मोरे यांच्या उपस्थितीत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आरोग्य सहाय्यक पीएम राठोड आरोग्य सहायिका एन एस भाले औषधी निर्माणाधिकारी जाधव सर तसेच हेल्थ सुपरवायझर कासार मॅडम उपस्थित होत्या उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देत अधिकाधिक लोकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आव्हान केले या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होईल..

