विशेष प्रतिनिधी भीमराव खंडारे
खामगाव / तालुक्यातील ग्राम नायदेवी येथील मयत कृष्णा सखाराम खंडारे यांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी त्याचप्रमाणे मृत्यू दाखला मिळण्यासाठी जन्म मृत्यू अधिनियम 1969 चे कलम 13(3) प्रमाणे मृत्यू नोंदीच्या प्रस्तावावर ग्राम नायदेवी येथील ग्रामसेविका गेल्या आठ महिन्यापासून सह्या करण्यासाठी टाळाटाळ करत असून मौजे नायदेवी येथील रहिवासी मयत कृष्णा सखाराम खंडारे यांच्या मृत्यूच्या नोंदी बाबत पूर्ण प्रस्ताव घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या आठ महिन्यापासून चकरा मारूनही मृत्यु नोंदीच्या प्रस्तावावर ग्रामसेविका वानखेडे मॅडम हे सह्या करण्यासाठी टाळाटाळ करत असून मृत्यूचा दाखला मिळण्यापासून ग्रामसेविका रोखत असल्याचा रोज संबंधित ग्रामसेविकेवर असल्याकारणाने भाई महेंद्र खंडारे भूमि मुक्ती मोर्चा तालुका कार्याध्यक्ष तथा बहुजन मुक्ती मोर्चा तालुका अध्यक्ष खामगाव यांनी ग्रामसेविका यांनी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर केला आहे. त्यासाठी दि. 09/03/2026 रोजी आमरण उपोषणाचा पवित्रा हाती घेऊन गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांचे कार्यालय समोर आमरण उपोषणाला बसले होते त्या अनुषंगाने सदर उपोषण मंडपामध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम नायदेवी येथील ग्रामसेविका वानखडे मॅडम, त्याचप्रमाणे ग्रामसेवक संघटनेचे नेते गवई साहेब यांच्या वतीने सदर उपोषण मागे घेण्याबाबत सांगता करण्यात आली त्याचप्रमाणे लेखी पत्राद्वारे सांगण्यात आले की,
येत्या दोन दिवसात सदर नोंदीचा प्रस्ताव पूर्ण करून दिला जाईल तसेच तहसील कार्यालयामध्ये सादर करून आपल्याला त्याची प्रत सुद्धा देण्यात येईल. मयत कृष्णा सखाराम खंडारे यांच्या मृत्यूची नोंद करून आपल्याला लवकरात लवकर मृत्यू दाखला सुद्धा तहसील स्तरावरून देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
केवळ एका नोंदीच्या प्रस्तावासाठी उपोषणाचा पवित्रा हाती घेण्यासाठी सर्वसामान्य माणसाला जबाबदार अधिकारी/कर्मचारी भाग पाडत आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे अशी सूचना यावेळी भाई सारंगधर वाकोडे जिल्हा प्रभारी भूमी मुक्ती मोर्चा यांनी केली आहे. नोंदीचा प्रस्तावावर सही घेण्यासाठी ग्रामसेवकाजवळ एका संघटनेच्या तालुका अध्यक्षाला आठ महिने पायपीट करावी लागत आहे तसेच उपोषण करावे लागत आहे तर सर्वसामान्य माणसाचं काय अस्तित्व भाई महेंद्र खंडारे यांनी त्यांची भूमिका ठामपणे सांगितले आहे.
उपोषण मंडपात सोडवणूक करण्यासाठी आलेल्या ग्रामसेविकेने उपोषणकर्त्याशी वाद करत अटीतटीमध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी गवई साहेब यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनामध्ये मागणी रास्त आहे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे लेखी पत्र देऊन उपोषणकर्त्याला नारळ पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
सदर उपोषणाला भूमी मुक्ती मोर्चा बहुजन मुक्ती मोर्चा संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे, राज्य प्रवक्ता भाई बाबुराव सरदार, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मोरे, शिवसेनेचे नेते बघे साहेब, रिपब्लिकन सेना जिल्हा प्रभारी भीमराव गवई, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे, भूमि मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष शेगाव विलास पहुरकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दांडगे, भूमी मुक्ती मोर्चा खामगाव तालुका उपाध्यक्ष गौतम जाधव, तालुका संघटक विजय इंगळे व समस्त कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
