विदर्भ शेतकरी सक्षमिकरण कार्यक्रम
चांदुर रेल्वे :- विदर्भ विभागातील शेतकरी यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपलब्ध संसाधना चा वापर करुन वर्मी कंपोस्ट चे बेड तयार करुन सेंद्रिय पद्दतीने शेती करावे असे मनोगत हर्षद ठक्कर अध्यक्ष रोटरी क्लब मिड सिटी मुंबई यांनी दिनांक 22 मार्च रोजी साईबाबा ग्रामीण विकास संस्था, चांदुर रेल्वे, रोटरी क्लब, बोंबे मिड सिटी मुबंई, माता बाल संगोपन संस्था मुबंई,सारथ फॉउंडेशन यांच्या संयुक्त शाश्वत विकास केंद्र सोनगाव रोड येथे विदर्भ शेतकरी सक्ष्मीकरन अभियान च्या विदर्भ स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम मध्ये मत व्यक्त केले.
या प्रशिक्षण मध्ये उदघाट्न प्रसंगी मा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पी आर ओ मा नितीन कुळकर्णी, हर्षद ठक्कर, अध्यक्ष रोटरी क्लब मुंबई, मा, प्रा घनश्याम दरणे, यवतमाळ, बंडू आंबटकर सयोजक ग्रामसेवा लोक अभियान ( विदर्भ ) गोपाल देवकर, बुलढाणा, दिलीप बिसेन यांची उपस्थिती होती, या प्रशिक्षण ला विदर्भ विभागातून शेतकऱ्यांना बरोबर कार्य करणाऱ्या 25 सेवाभावी संस्था व 30 शेतकरी उपस्थित होते या प्रशिक्षण ला उपस्थित होत्या माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याचे पी, आर, ओ नितीन कुळकर्णी यांना पाठवून ऍग्रो व्हिजन, पूर्ती समूहाचे शेतकऱ्यांन बरोबर सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली या विदर्भ स्तरीय प्रशिक्षण चा उद्देश व पुढील वाटचाल प्रास्तावीक बंडू आंबटकर यांनी केले. उपस्थिती संस्था व शेतकरी यांना रोटरी क्लब बोंबे मिड सिटी मुबंई मार्फत वर्मी कंपोस्ट बेड वाटप करण्यात आले या प्रशिक्षण मध्ये मुख्य प्रशिक्षण व प्रत्यशिक स्वेता गायकवाड राजगुरूनगर यांनी समजून दिले. कार्यक्रम चे सूत्रसंचालन अमोल निरडकर यांनी केले या कार्यक्रम मध्ये समाजप्रोबोधन शाहीर उत्तम इंगोले यांनी केले या कार्यक्रम च्या यशस्वी ते करिता सहआयोजक संस्था प्रतिनिधी व साईबाबा संस्थेच्या सर्व कार्यकर्ता नी अथक परिश्रम घेतले.

