सिलेंडर बुकिंग करिता दिलेला फोन नंबर लागत नसल्याची नागरिकांची तक्रार
सिलेंडर साठी नागरिकांची भटकंती
तळेगाव दशसर :- स्थानिक गाव हे धामणगाव रेल्वे तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या ठिकाणी एच पी. भारत गॅस, इंडियन गॅस इत्यादी एजन्सी असून मात्र सिलेंडर साठी नागरिकांची भटकंती होतांना दिसत आहे. सदर एजन्सी धारक ग्राहकांना सिलेंडर बुकिंग साठी फोनवरून नंबर लावायला सांगत आहे. परंतु बऱ्याच ग्राहकांचा फोनवरून नंबर लागत नसल्याचे प्रत्यक्ष बोलून दाखविले आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर धारक विचलित झाले आहे. व एजन्सी धारक ग्राहकांना योग्य मार्गदर्शन तसेच योग्य माहिती देत नसल्याचे बोलले जात आहे.

