शहरातील डागा लेआऊट परिसरातील घटना अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल
विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूरः शहरातील डागा लेआऊट गाडगे नगर परिसरात एकाच रात्री तिघांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली घरातील लोखंडी कपाट फोडून रोख रकमेची चोरी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
प्राप्त माहीतीनुसार,डागा लेआऊट गाडगे नगर महाकाली परिसरात एकच रात्री तीन घरात चोरी झाली असून याबाबत रंगराव शामराव खांडेकर वय ३९ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व्यवसायाने केअरटेकर असून ते कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांनी विविध कामांतून साठवलेली सुमारे २७ हजार ४९० रुपयांची रक्कम घरातील किचन मध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवली होती.२४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या पत्नीला तब्येतीच्या कारणास्तव उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर खांडेकर कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, २४ फेब्रुवारीच्या रात्री १०.३० ते २५ फेब्रुवारीच्या सकाळी ६.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून किचन मध्ये असलेल्या कपाटाचे लॉक तोडत आत ठेवलेली 27000व कूलर वर ठेवण्यात आलेले 490 अशी एकूण 27490 रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले.सकाळी घरी परतल्यानंतर कपाट उघडून पाहिले असता लॉकरमधील पैसे गायब असल्याचे लक्षात आले. घरातील इतर साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहत तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून महाकाली परिसरातील नागरिकांनी रात्र गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
.jpeg)