मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कवी संमेलन व शेरोशायरी कार्यक्रम उत्साहात संपन्न

 




मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाचा निर्धार

-----------------------------

मुंबई(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ ( MMMPS ) या अखिल महाराष्ट्रातील अग्रगण्य पत्रकार संघटना ही संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय अशोक तोडणकर यांनी २००१ साली स्थापन करत समाजासाठी अनेक वर्षे त्यांनी काम करत त्यांच्या पश्चात आप्पासाहेब तोडणकर यांनी ती कार्यरत ठेवली व पत्रकार संघचे सध्याचे अध्यक्ष प्रकाश पाटकर यांच्या व अनेक पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सध्या सामाजिक कार्य करत आहे, महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ च्या २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करत कवी संमेलन, शेरोशायरी व भावगीतांचा बहारदार कार्यक्रम उत्साहात व दिमाखात

लोअर परळ येथील आर्य समाज हॉल येथे शुक्रवार दिनांक २७,फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजता या वेळेत संपन्न झाला,

 आर्य समाज हॉल येथे रंगलेल्या या साहित्य मैफलीला साहित्यप्रेमी, पत्रकार,कवी-लेखक व नागरिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली, या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे भायखळा मतदारसंघातील नगरसेवक रोहिदास लोखंडे,ज्येष्ठ कवी व माजी शिक्षणाधिकारी डॉ. जिवबा रामचंद्र केळुसकर, कवयित्री लेखिका व दैनिक "मुंबई मित्र" च्या संपादिका सौ.अनघा अशोक राणे, संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटकर,उपाध्यक्ष ऍड.सुनील शिर्के,प्रमुख कार्यवाहक अशोक भोसले, सहसचिव शशिकांत सावंत यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली,दीपप्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर तसेच संघटनेचे संस्थापक स्वर्गीय अशोक तोडणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वसंत पाटकर यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेत रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध साहित्यिक, सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील उपक्रम राबविण्याचा मानस व्यक्त केला.


प्रमुख पाहुणे डॉ.जिवबा रामचंद्र केळुसकर यांनी आपल्या मनोगतात मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करत “प्रत्येकाने मराठी बोलले पाहिजे; मला मराठीने खूप काही दिले,” असे सांगितले. मराठी ही केवळ व्यवहाराची भाषा नसून ती संस्कार,विचार आणि आत्मसन्मान जपणारी मातृभाषा आहे असे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याचा फायदा मला जीवनात झाल्याचं त्यांनी सांगत लहान मुलांची मराठीत बोलले पाहिजे,घराघरात त्यांना संस्कृत श्लोक शिकवले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले.


कवयित्री व लेखिका,संपादिका सौ.अनघा राणे यांनी मराठी भाषेमुळे आपण संस्कार,परंपरा आणि आपुलकीची नाळ जपत आलो आहोत असे सांगितले.भाषेमुळे समाजात परस्पर सहकार्य, बंधुभाव आणि सांस्कृतिक ऐक्य वृद्धिंगत होते असे त्यांनी नमूद केले.


भारतीय जनता पार्टीचे भायखळा येथील नगरसेवक रोहिदास लोखंडे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत केंद्र शासन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. मराठी भाषेच्या समृद्ध इतिहासाला मिळालेला हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमात मान्यवरांनी मराठी भाषेचा गौरव,तिची समृद्ध संस्कृती,प्रतिष्ठा, परंपरा आणि आधुनिक युगातील महत्त्व अधोरेखित केले.या कवी संमेलनात अनेक कवी व कवयित्रींनी सहभाग घेतला कवी अशोक सुकाळे, सौ विद्या डोंबे, ॲड.सोपान बुडबाडकर,सौ सोनाली जगताप,सौ गीतांजली वाणी, श्रीमती गीताश्री नाईक, सौ सुनीता काटकर, श्री अशोक पुंडलिक उर्फ भाई नार्वेकर, सु. ना सरपडवळ, डॉक्टर शैलजा करोडे, प्रभू अग्रहारकर,डॉ.रेवती आळवे,डॉ. खं रा माळवे, ऍड. बाळासाहेब तोरस्कर, बबन येरम,यासह अनेकांनी कविता सादर केली, जागतिकीकरणाच्या युगात विविध भाषांचा स्वीकार करतानाच मातृभाषेचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


मराठी भाषेतील शब्दसंपदा, साहित्यवैभव,संत परंपरा, समाजसुधारकांचे विचार आणि आधुनिक पत्रकार,कवी,लेखक योगदान यामुळे मराठी ही संस्कारी,शौर्य निर्माण करणारी भाषा असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

विविध कवींच्या प्रभावी कविता, शेरोशायरी आणि भावगीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले,मराठी भाषेच्या माधुर्याचा आणि अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचा अनुभव या कार्यक्रमातून सर्वांना मिळाला.

संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी व सल्लागारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले,कवी संमेलनात सहभागी झालेल्या कवींचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्ष प्रकाश पाटकर, उपाध्यक्ष सुनील शिर्के, सचिव अशोक विठ्ठल भोसले आणि सहसचिव शशिकांत सावंत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.


सदर कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार,कृष्णा काजरोळकर (सल्लागार ),गुरुनाथ तिरपणकर( सल्लागार), जगन्नाथ कामत( सल्लागार),छाया गचके(खजिनदार),डॉ.सूर्यभान डोंगरे (संयुक्त कार्यवाह),आप्पासाहेब जगदाळे(कार्यकारिणी सदस्य), (आण्णासाहेब आहेर ( कार्यकारिणी सदस्य)अशोक लांडगे ( कार्यकारणी सदस्य ),रवी नानचे ( कार्यकारणी सदस्य )यासह अनेक सदस्य व सहयोग व्यक्तिमत्त्वांचा सहयोग कार्यक्रमाला लाभला,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळे यांनी प्रभावीपणे केले, कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या खजिनदार श्रीमती छाया गचके यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले,

मराठी भाषा दिनानिमित्त पार पडलेला हा काव्यमय सोहळा मराठी भाषेचा अभिमान जागवणारा,तिच्या वैभवशाली परंपरेची जाणीव करून देणारा आणि नव्या पिढीला मातृभाषेच्या जतन-संवर्धनासाठी प्रेरणा देणारा ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post