जातीमुफ्त गाव सोबत अक्षर मानवचा संवाद सहवास उपक्रम नियोजित

 

अक्षर मानव संघटना



{ अक्षर मानवचे राज्य नियंत्रक आझाद जमा खान यांनी दिली माहिती. }

महाराष्ट्रआजपर्यंतचा सगळ्यात आगळा वेगळा कार्यक्रम म्हणजे 'संवाद सहवास' अक्षर मानव संघटना सतत कार्यक्रम आयोजित करत असते. या वर्षीचा ' संवाद सहवास : बावीसवा आहे.

 दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत हा कार्यक्रम चालेल सौंदाळा या ग्रामपंचायत मध्ये हा संवाद सहवास कार्यक्रम होईल. सौंदाळा हे गाव ता. नेवासे, जिल्हा अहिल्यानगर मध्ये आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक गावचे सरपंच शरद अरगडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली गाव जातमुफ्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून सर्वच ग्रामस्थ सौंदाळा गाव राहणार आहे. एक पूर्ण गाव जातीमुक्त होते म्हणजे काय ? आणि कसे झाले हे परिवर्तन , गावातील सर्व नागरिक समान कसे राहतात प्रत्येक व्यक्ती माझी जात 'मानव' ही भावना कशी स्वीकारली, सार्वजनिक ठिकाणे, शासकीय योजना, ग्रामपंचायत सेवा, सामाजिक -धार्मीक कार्यक्रम, विवाह, सण -उत्सवात जातिभेद पूर्णपणे बंद कसे झाले, महाराष्ट्रातील पहिले जातमुफ्त गाव कसे बनले. अश्या अनेक विषयांवर हे गावकरी बोलणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध कथा -लेखक, कादंबरीकार डॉ. राजन खान सर आवर्जुन उपस्थित राहणार आहेत. अक्षर मानवच्या या कार्यक्रमाला राज्य भरातुन अनेक महत्त्वाचे व्यक्ती हजेरी लावणार आहेत. अशी माहिती अक्षर मानवचे राज्य नियंत्रक आझाद खान यांनी दिली.

समाजात राबलेल्या एका मान्यवर, अभ्यासू व्यक्तीला बोलवावं आणि सलग त्या व्यक्तीच्या संगतीत राहावं, त्याला, त्याच्या कामाला समजून घ्यावं आणि आपण, आपला समाज उन्नत होण्यासाठी काही घावतंय का ते शोधावं, असा एक 'संवाद सहवास' नावाचा अनोखा उपक्रम अक्षर मानवकडून नियमित घेतला जातो. या आधीचे संवाद सहवास डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. गणेश देवी, डॉ. अनिल अवचट, डॉ. तारा भवाळकर, निखिल वागळे, विनायकदादा पाटील, कुमार केतकर, राजदत्त, नागराज मंजुळे, नागेश भोसले, अतुल पेठे, रामदास फुटाणे, हरी नरके, संजय आवटे, डॉ. कुमार सप्तर्षी, सयाजी शिंदे, डॉ. राजेंद्र धामणे आणि डॉ. सुचेता धामणे, निरंजन टकले, ॲड. असीम सरोदे, विवेक सावंत , राजू परुळेकर यांच्याशी झाले. आता संवाद सहवास होतोय सर्वच ग्रामस्थ सौंदाळा गाव यांच्याशी. होत आहे.

निवांत, शांत ठिकाणी जमावं आणि मनमोकळ्या संवादाचा अनौपचारिक आनंद घ्यावा, विचारमंथन व्हावं असा हा कार्यक्रम आहे. स्थळ : ग्रामपंचायत सौंदाळा, ता. नेवासा, जि. अहमदनगर. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जेवण आणि चहाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.

कसलीही फी : नाही अशी माहिती अक्षर मानवाचे राज्य संघटक प्रा. सुजित चव्हाण यांनी सांगितले. स्थानिक सर्व नियोजन समाजसेवा विभागाचे राज्य संघटक हरिभाऊ उगले व स्थानिक अक्षर मानवचे पदाधिकारी हे पाहत आहेत. या कार्यक्रमाला येण्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणी संपर्क 

फक्त व्हाट्असअप  : 

 हरिभाऊ उगले (9881218706) , 

 सुजित चव्हाण (9527212233)

आझाद खान (+919975326210)

आपलं येणं पक्कं असेल तरच , यांपैकी कृपया एकाच व्यक्तीकडे आपली नाव नोंदणी करा. या संवाद सहवास कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे अक्षर मानवचे राष्ट्रीय अध्यक्ष अजिंक्य किन्हीकर व महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रा. प्रवीण जावळे, राज्य उपाध्याक्ष दीपेश मोहिते तसेच संपूर्ण अक्षर मानवच्या राज्य कार्यकारिणीने नागरिकांना आवाहन केले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post