तीन गावात हातभट्टी दारूचे अड्डे उध्वस्त

 

महाराष्ट्र पोलीस

 साडे सतरा हजार रुपयाचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट 


पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतःच उतरले मैदानात 

विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे

श्रीक्षेत्र माहूर :- माहूर तालुक्यात हातभट्टी दारू बनविणाऱ्या वर गुन्हे दाखल झाल्याने तस्कर कोमात जात असताना हातभट्टी दारू बनविण्यासाठी नवीन तस्कर तयार होत असल्याने खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतःच हातभट्टी अड्ड्यावर धाडी टाकून दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करत आरोपींना जेर बंद करून जबरदस्त महाप्रसाद देण्यात येत असल्याने दि .21 रोजी एकाच दिवसात तीन गावात धाडी टाकून साडेसातरा हजार रुपयाचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात येऊन तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची घटना घडल्याने हातभट्टी दारू बनविण्याचा विचार करणाऱ्यात घबराट पसरली आहे.

माहूर तालुक्यात बेरोजगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने अनेक युवक व्यसनाधीन बनत चालले असून व्यसन करण्यासाठी स्वस्त पर्याय म्हणून हातभट्टी दारूला जग मान्यता मिळालेली आहे त्यामुळे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड्यापाड्यात सुरू असलेले अनेक हातभट्टीचे अड्डे उध्वस्त करण्यात येऊन गुन्हे दाखल झाल्याने नवनवीन पिदाडे कमी खर्चात दारू काढून मोजमजा करण्याच्या नादात हातभट्टी लावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत परंतु पोलिसांचे खबरी प्रत्येक गावात असल्याने माहिती मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे स्वतःच हातभट्टी अड्डे उध्वस्त करत गुन्हे दाखल करून वेळप्रसंगी गुन्हेगारांना जबरदस्त महाप्रसाद ही देत आहेत.

दि. 21 रोजी खबर मिळताच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी स्वतः पोलिसासमवेत इवळेश्वर येथील नाल्यात धाड टाकून पन्नास लिटर दारूबविण्याचे रसायन तसेच कसार पेठ येथे 200 लिटर तर वानोळा येथे 100 लिटर मोह फुलाचे रसायन तसेच इतर साहित्य नष्ट करून तिघांवर गुन्हे दाखल केले असून एकूण 17 हजार 500 रुपयांचे रसायन आणि साहित्य नष्ट केले असून या कारवाईत पोलीस निरीक्षक देविदास चोपडे पोहेका प्रकाश गेडाम पोहेका गजानन चौधरी पो का पवन राऊत पिठलेवाड रणमले राठोड यांनी कारवाई केली असून ठाणे आमलदार पुष्पा पुसनाके यांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post