अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माहूर तालुका अध्यक्षपदी मनोज किर्तने यांची निवड
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांची उपस्थिती
श्रीक्षेत्र माहूर : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि 21 रोजी माहूरच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत माहूर तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली.
या बैठकीत सर्वानुमते माहूर तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी मनोज कीर्तने तर उपाध्यक्ष म्हणून डॉ बाबाराव डाखोरे व राज ठाकूर कार्याध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर कराळे पाटील सल्लागार म्हणून डॉ प्रकाश जैन यांची निवड करण्यात आली प्रधान सचिव जयकुमार अडकिने व सुभाष खडसे बुवाबाजी विरोधी संघर्ष विभागाच्या अध्यक्षपदी पत्रकार इलियास बावाणी यांची निवड करण्यात आली.
विविध उपक्रम विभाग साजिद खान वैज्ञानिक जाणीव व शिक्षण प्रकल्प विभाग राजेंद्र चारोडे महिला सहभाग विभाग सौ सुरेखा तळणकर युवा सहभाग विभाग आकाश कांबळे जोडीदाराची विवेकी निवड विभाग ॲड. गजानन चांदेकर जात पंचायत मूठमाठी अभियान विभाग प्राध्यापक विनोद कांबळे आंतरजातीय आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाह विभाग प्राध्यापक राजेंद्र लोने विवेक जागर प्रकाशन व वितरण विभाग अर्जुन जाधव अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विभाग राजेश मगरे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग डॉ पद्माकर जगताप विज्ञान बोधवाहिनी विभाग मिलिंद कंधारे सांस्कृतिक अभिव्यक्ती विभाग एस एस पाटील सोशल मीडिया व्यवस्थापन विभाग राजकिरण देशमुख निधी व्यवस्थापन विभाग राजकुमार पडलवार कायदेविषयक व्यवस्थापन विभाग ॲड.अविनाश ढगे व्यसन प्रबोधन आणि संघर्ष विभाग प्रल्हाद चव्हाण संविधान जागर विभाग ॲड. भारतीताई गजानन शिंदे सर्वेक्षण आणि संशोधन विभाग उमेश डाखोरे दस्तऐवज संकलन विभाग राजीक शेख विवेक वाहिनी विभाग मंगेश जाधव यांचे सह मान्यवरांची विविध विभागात निवड करण्यात आली
निवड झालेल्या सर्वांचे स्वागत राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
