मा. जिल्हाधिकारी तथा जलयुक्त शिवार योजनेचे अध्यक्षासह जिल्हा कृषि अधीक्षकांकडे निवेदन देऊन शासकीय गुत्तदारांनीच केली चौकशीची मागणी
सन - 2024-2025 कृषी विभागा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना अंतर्गत केलेल्या कामाचे मोजमाप घेण्यास जाणीवपूर्वक विलंब करून नियमबाड़ा पद्धतीने परस्पर मोजमापे घेणे, आर्थिक नुकसान व शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबाबत चौकशी व कायदेशीर कारवाई करण्या साठी म्हणून शासकीय गुत्तेदार असून सन 2024-2025 कृषी विभागांतर्गत पाणलोट योजना 2.0 अंतर्गत नांदेड जिल्हा माहूर तालुक्यातील
1) मॅडकी- कार्यारंभ आदेश जा.क्र/उविकअ / तंत्र/JAL-2.0 का.आ./328/2025, दि. 22/04/2025,
2) मुंगशी कार्यारंभ आदेश जा.क्र/उविकअ / तंत्र/JAL-2.0 का.आ./329/2025, दि. 22/04/2025, येथील ढाळीचे बांधाचे कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आले.
माहूर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, सुपरवायझर व कृषी सहाय्यक यांना शासकीय गुत्तेदाराने प्रत्यक्षात वारंवार कार्यालयात भेट घेऊन व भ्रमणध्वनीद्वारे केलेल्या कामाचे मोजमाप घेण्यासाठी अनेक वेळा विनंती केली. परंतु वरील लोकांकडून मोजमाप घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात आली ही बाब माननीय जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांच्या कार्यालयात जाऊन प्रत्यक्षात भेटून दोन ते तीन वेळा मी केलेल्या कामांची मोजमाप घेण्यास संबंधीतांकडून विलंब करत असल्याबाबतची माहिती दिल्याने मा. अधीक्षक साहेबांनी विना विलंब भ्रमणध्वनी वरून तालुका कृषी अधिकारी माहूर यांना कामांचे मोजमाप घेण्यासाठी म्हणून तोंडी आदेशित केले. तरीसुद्धा मोजमाप घेण्यात आलेले नाहीत. शासकीय गुत्तेदाराने पुन्हा मा. अधीक्षक साहेबांची भेट घेत कामांची मोजमाप घेण्यासाठी म्हणून विनंती केली असता मा. अधीक्षक साहेबांनी नांदेड येथील जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय येथे कामास जबाबदार असलेल्या सर्वाधिकारी कर्मचाऱ्यांना व गुत्तेदारांस दिनांक 17/12/2025 रोजी हजर राहण्यास सांगितले त्या रोजी माहूरचे कर्मचारी व अधिकारी अनुपस्थित होते. त्याच अनुषंगाने दिनांक 22/12/2025, रोजी उपविभागीय कृषी कार्यालय भोकर येथे सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना व गुत्तेदारांना हजर राहण्याचे आदेशित केले त्या अनुषंगाने जबाबदार सर्व कर्मचारी अधिकारी सहगुतेदार हजर होते सर्वांसमक्ष मा. अधीक्षक साहेबांनी झालेल्या कामाची मोजमापे आठवड्याभरात सादर करण्याचे सर्वांसमोर आदेशित केले. परंतु वरिष्ठांच्या आदेशाचे वेळोवेळी उल्लंघन करत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मोजमापे घेण्यास विलंब केला आहे.
सदर कामे दिनांक 22/05/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आली असून शासनाच्या नियमानुसार संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत मोजमाप घेणे आवश्यक असताना आम्ही वारंवार प्रत्येक्ष भेटून व भ्रमनध्वनी व्दारे विनंती करूनही कृषी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक मला न कळवता माझया अनुउपस्थितीत मोजमापे घेण्यात आली जी की, शासकीय गुत्तेदारास मान्य नाहीत.
सन - 2024-2025 मध्ये माहूर तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 950 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्यामुळे अतिवृष्टी जाहीर करण्यात आली होती. अशा परिस्थितीतही कृषी विभागाने हेतुपुरस्सर विलंब करून जानेवारी-2026 मध्ये आम्हाला कोणतीही सूचना न देता आमच्या अनुपस्थितीत परस्पर मोजमापे घेऊन ती कार्यालयात सादर केली.
ही कृती खालील कायदेशीर बाबींचे स्पष्ट उल्लंघन आहे-
1) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियमावली व शासकीय कामकाज प्रक्रियेनुसार कामाची मोजमापे ही गुत्तेदारांच्या समक्ष घेणे बंधनकारक आहे.
2) जाणीवपूर्वक विलंब करून चुकीची मोजमापे घेणे हे शासकीय कर्तव्यातील कसूर (Misconduct) असून सेवा नियमांचे उल्लंघन आहे.
3) भारतीय दंड संहिता (IPC) कलम 166 शासकीय अधिकाऱ्यांकडून कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांचे नुकसान करणे,
4) IPC कलम 420 - फसवणूक करून आर्थिक नुकसान करणे.
5) IPC कलम 409 - शासकीय कर्मचारी विश्वासघातास जबाबदार ठरणे.
परस्पर घेतलेली मोजमापे ही प्रत्यक्ष केलेल्या कामापेक्षा कमी असून त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे तसेच मानसिक त्रासही होत आहे.
खालीलप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्याची कृपा करावी..
1) पुणे दक्षता पथक मार्फत ग्रामपातळीवर चावडी वाचन घेऊन कृषी कार्यालयामार्फत शेतीकरी कल्याणकारी योजनेच्या चौकशी
2) सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र समिती नेमावी.
3) चौकशी समितीमार्फत प्रत्यक्ष स्थळावर पुन्हा नव्याने मोजमापे घेऊन मोजमाप पुस्तिकेत योग्य नोंदी कराव्यात.
4) दोषी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून निलंबन व दंडात्मक कारवाई करावी.
5) आम्हाला झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम संबंधित दोर्षीच्या वेतनातून कपात करून व्याजासह अदा करण्यात यावी.
6) आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत.
आपण या गंभीर विषयाची दखल घेऊन न्याय द्याल, अशी अपेक्षा आहे. शासकीय गुत्तेदाराच्या निवेदनाच्या अनुषंगाने जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे
जा.क./जि.अ.कृ.अ.नां./आस्था-4/770/2026
दिनांक:-17/02/2026
शासकीय गुत्तेदार
1) विश्वा गुलाबराव शिदै इंजिनीर अॅण्ड शा. कॉन्ट्रॅक्टर नांदेड यांचा अर्ज दि. 29/01/2026.
2) श्री नारायण रामराय तमन्ना इंजिनौर अॅण्ड कॉन्ट्रैक्टर नांदेड यांचा अर्ज दि29-01-2026.
आदेश
उपरोक्त वाचा क. 1 व 2 अन्वये विश्वा गुलाबराय शिदै इंजिनौर अॅण्ड शा. कॉन्ट्रॅक्टर नांदेड व श्री नारायण रामराव तमन्ना इंजिनीर अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर नांदेड यांनी दिलेल्या अजीत सन 2024-25 कृषि विभागा अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजना अंतर्गत केलेल्या कामाचे मोजमाप घेण्यास जाणीवपुर्वक विलंब करून नियमबाह्य पध्दतीने परस्पर मोजमापे घेणे, आर्थिक नुकसान व शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याबाबत चौकशी व कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती केलेली आहे.
तरी सदरील प्रकरणी खालील प्रमाणे त्रिसदस्यीय समिती नेमण्यात येयुन तक्रार अजोल नमुद मुयाची मुयेनिहाय चौकशी करुन विभागीय चौकशी नियम पुस्तिका चौथी आवृती 1991 मधील 1.8 च्या तरतुदी नुसार प्राथमिक चौकशी करुन तकार निहाय स्वतंत्र अहवाल आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह, ठोस निष्कर्षासह व पुरावें दर्शक कागदपत्रांसह चौकशी अहवाल जबाबदार दोषी असलेले अधिकारी, कर्मचारी यांच्या नावासह 15 दिवसात या कार्यालयास सादर करण्यात यावा..
अ.क्र. अधिकारी / कर्मचारी यांचे नाव
1) श्री.के.एन.वानखेडे
2) श्री.एस.व्ही.उप्पलवार
3) श्रीमती पी.एस. देशमुख
सोबतः संदर्भीय तक्रार अर्ज.
पदनामपद
1)कृषि उपसंचालक, जि.अ.कृ.अ.. नांदेड अध्यक्ष.
2)उप कृषि अधिकारी उ.वि.कृ.अ. नांदेड
सचिव.
3)उप कृषि अधिकारी उ.वि.कृ.अ.. नादेड.
सदस्य त्रि सदस्य समिती नेमून शासकीय नारायण रामराव तमन्ना इंजिनीर अॅण्ड कॉन्ट्रॅक्टर नांदेड.विश्वा गुलाबराव शिदँदै इंजिनीर अॅण्ड शा. कॉन्ट्रेक्टर नांदेड.गुत्तेदारास चौकशी करणे हजर राहण्यास सांगितले आहे.
